बुद्ध जयंतीनिमित्त निकाळजे दांपत्याने केला देहदानाचा संकल्प..!
------------------
आष्टी/प्रतिनिधी
आष्टी येथील रहिवासी असलेले किशोर रामचंद्र
निकाळजे व त्यांची पत्नी उषा किशोर निकाळजे या दांपत्याने बुद्ध जयंती निमित्त देहदान करण्याचा संकल्प घेतला आहे.
अलीकडच्या काळात वैदयकिय क्षेत्रात झपाट्याने बदल होत असून रुग्णांना सोयीसुविधा मिळत आहेत. समाजामध्ये नवनवीन अत्याधुनिक शस्त्रक्रिया,नवे उपचार आजार याबाबत उत्सुकता असते. कुठल्याही आजारावर मात करण्याची किमया वैदयकीय क्षेत्राने केली आहे. कितीही गंभीर असो, नवे संशोधन, नव्या आधुनिक उपचार पद्धतीमुळे तो बरा होण्याची शक्यता १५ टक्क्यांपर्यंत गेली आहे, वैदयकीय शास्त्राचे हे मोठे यश म्हणावे लागेल. त्यातच एक महत्त्वाचे यश म्हणजे अवयवदान व त्याचे प्रत्यारोपण.
पूर्वी शहरांमध्ये अवयव दानाबद्दल जास्त जागृती होती. पण आता खेड्यांमध्ये देखिल याबद्दल माहिती पोहोचत आहे आणि तिथे देखिल याचा प्रसार होत आहे. पूर्वी रक्तदान, नेत्रदान करण्यासाठी कोणी व्यक्ती पुढे येत नव्हती. आता त्याबद्दल मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली आहे. अनेक ठिकाणी होताना दिसतात. नेत्रदानासाठीही लोकांच्या मनात जागृती रक्तदान शिबिरे निर्माण होत आहे आणि त्यांचा सहभागही वाढला आहे. तशाच प्रकारे जगात अवयव दानाचे महत्त्व वाढताना दिसत आहे. काहीजन देहदान करून समाजासमोर एक चांगला आदर्श ठेवताना आपण पाहतो. अवयवदान म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते, तेव्हा त्या व्यक्तीच्या शरीरातील किडनी, 'हृदय, यकृत, डोळे, फुफ्फुसे, स्वादुपिंड व त्वचा हे अवयव देणे होय. यामुळे अनेक लोकांना जीवदान मिळते. मरणाच्या अवस्थेत असलेली माणसे पुन्हा एकदा चांगले आयुष्य जगू शकतात, हे मोठे सामाजिक कार्य म्हणावे लागेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अवयवदानाचे महत्त्व जाणून रुग्ण जागृती होण्यासाठी सेवेसाठी मोठ्या प्रमाणात अवयवदान अभियान' हाती घेण्या- बाबत सूचीत केले होते. यात वैदयकीय, शिक्षण. सार्वजनिक आरोग्य विभाग व उच्च व तंत्र शिक्षण विभाग या विभागांमार्फत महाअवयवदान जागृतीबाबत तसेच महसूल विभाग, गृह विभाग यांच्या सहकार्याने व समन्वयाने विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.
यावेळी किशोर निकाळजे म्हणाले की, माझ्या अवयवांचा चांगल्या प्रकारे उपयोग झाला पाहिजे.व माणुसकिच्या पुण्यकर्मासाठी उपयोग झाला पाहिजे.माझ्या पुढील पिढ्यांनी या आग्रहाचा मान राखावा म्हणून मी सतत स्मरण देत राहील.आणि पुढील पिढ्यांवर असेच संस्कार रहावे म्हणून मी सदैव प्रयत्नशील राहील अशी माहिती किशोर निकाळजे यांनी तेजवार्ताशी बोलताना दिली आहे.
यावेळी आकाश ढवळे, माजी नगरसेवक दिपक दादा निकाळजे,ॲड.प्रबोधन निकाळजे. आष्टी ट्रामा केअर सेंटर मधील सर्व डॉक्टर्स सिस्टर्स कर्मचारी, आणी एक भाग जगण्याचा प्रतिष्ठान आष्टी यांनी विशेष अभिनंदन केले.
stay connected