सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधीच महाराष्ट्रातल्या काही राजकीय पंडित आणि काही पत्रकार यांनी निर्णय देऊन टाकला
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे आणि विविध शक्यता यावर वर्तवल्या जात आहेत अशात देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? याची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. येत्या दोन दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षचा निकाल लागेल अशी चर्चा आहे. अशात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांना महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
१६ मार्च रोजी शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट यांच्यातील वादावर सुनावणी पूर्ण झाली. शिंदे गटाचे १६ आमदार पात्र ठरणार की अपात्र? याभोवती हे सगळं प्रकरण उभं राहिलं असून त्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून पुढील २ ते ३ दिवसांत निकाल येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नेमका कधी निकाल येणार? याबाबत वेगवेगळे दावेही केले जात आहेत. तसंच सरकार गेलं तर काय होईल? याचेही अंदाज वर्तवले जात आहेत. अशात देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं आहे. एवढंच नाही तर खासदार संजय राऊत यांनीही हे सरकार कोसळेल असं म्हटलं आहे. न्यायदेवतेवर आम्हाला विश्वास आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले आहेत देवेंद्र फडणवीस -
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येण्याआधीच महाराष्ट्रातल्या काही राजकीय पंडित आणि काही पत्रकार यांनी निर्णय देऊन टाकला आहे. पुढचे कॉम्बिनेशनही करुन टाकले. सरकारंही तयार करून टाकली. मला असं वाटतं की हे योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय हे खूप मोठं न्यायालय आहे. शांतपणे निर्णयाची वाट बघावी. आम्ही पूर्णपणे आशादायी आहोत. काहीही होणार नाही. आम्ही जे काही केलं आहे ते सगळं कायदेशीर आहे. त्यामुळे योग्य निर्णय येईल अशी आमची अपेक्षा आहे. असे फडणवीस म्हणाले .
stay connected