Rohit Pawar :ब्रिटीश राज परत आला आहे का? आ . रोहित पवार .

 ब्रिटीश राज परत आला आहे का? आ . रोहित पवार .



रिफायनरीच्या सर्वेक्षण वरून आंदोलन आणि पोलिसांमध्ये झालेल्या राड्यावरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया

रोहित पवारांचा सरकारवर निशाना

जामखेड - जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचार दरम्यान पत्रकारांनी छेडलेल्या प्रश्नाला उत्तर देतांना रोहित पवार म्हणाले की ;

आपण कोणीही विकासाच्या विरोधात नाही आपल्या सर्वांना असं वाटतं की विकास झालाच पाहिजे

मात्र विकास होताना तिथल्या लोकांना विश्वासात घेणे गरजेचे आहे

तुम्ही अशा पद्धतीने लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल


दडबशाहीचा वापर करून त्यांचा आवाज दाबत असाल तर हे लोकशाहीच्या विरोधात आहे 


अशा पद्धतीने हे सरकार जर वागत असेल तर ब्रिटिश राज परत आला की काय सवाल रोहित पवारांनी राज्य सरकारला केला आहे .

प्रतिनिधी नासीर पठाण सह पत्रकार आशोक निमोणकर जामखेड .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.