कडा येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून लोखंडी पाईपने दोघां भावडांना मारहाण..!
------------------
आष्टी/प्रतिनिधी
तालुक्यातील कडा येथील हाॅटेल व्यवसाय करणारे चंद्रकांत महादेव मोरे वय ४३ वर्षे व संतोष महादेव मोरे या दोघा भावांना लोखंडी पाईप सह लाकडी दांडक्याने जबर मारहाण करण्यात आली.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, संतोष महादेव मोरे हे नेहमीप्रमाणे आपले हॉटेल बंद करून घरी जात असताना शेजारीच राहणारे आरोपी दत्तु शंकर हुलगे व त्यांचा मुलगा दिनेश दत्तु हुलगे या दोघा बापलेकांनी संतोष मोरे यांस शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली.
संतोषने आरडाओरडा केला असता घरात बसलेले चंद्रकांत मोरे हे भांडण सोडवण्यासाठी पळत आले असता दत्तु हुलगे व दिनेश हुलगे यांनी चंद्रकांत मोरे यांनाही जबर मारहाण केली.तिथेच उभे असलेले चंद्रकांत मोरे यांची पत्नी आशा,आई सिंदुबाई व भावजय कल्पना सह अविनाश बाबुराव शिंदे यांनी भांडणे सोडवले व जखमींना कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.
चंद्रकांत महादेव मोरे यांच्या फिर्यादीवरून आरोपी दत्तु हुलगे व दिनेश हुलगे यांच्याविरोधात कलम ३२४ सह ५०४,५०६,३४ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती चंद्रकांत महादेव मोरे यांनी दिली आहे.


stay connected