शेरीफाटा ते मांडवा रस्ता कामाला ४ कोटी रूपयांचा निधी आ.धसांकडुन मंजुर
संदिप खाकाळ यांच्यासह ग्रामस्थांच्या मागणीला यश
कडा - गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने कायम.रहदारीच्या रस्त्यावर लोकांना अडचणी निर्माण होत असल्याने येथे रस्ता होणे आवश्यक असल्याची मागणी आमदार सुरेश आण्णा धस याच्याकडे सरपंच संदीप खाकाळ यांच्यासह ग्रामस्थांनी केली होती.या मगणीची दखल घेऊन आ.धस यांनी शेरीफाटा ते मांडवा रस्ता मंजूर करून ४ कोटी रूपये निधी मंजुर केला असल्याने ग्रामस्थांमधून त्याचे आभार व्यक्त केले जात आहेत.
आष्टी तालुक्यातील शेरीफाटा ते मांडवा हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अंत्यत खराब झाला होता.या रस्त्यावरील लोकांना दळणवळण करण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्याने हा रस्ता प्रश्न मार्गी लागावा यासाठी शेरीचे सरपंच संदिप खाकाळ याच्यांसह ग्रामस्थांनी आमदार सुरेश आण्णा धस याच्याकडे रस्ता प्रश्न मार्गी लागावा म्हणून मागणी केली होती.या मागणीची दखल घेऊन आ.धस यांनी शेरीफाटा ते मांडवा रस्ता मंजुर करत ४ कोटी रूपयांचा निधी प्राप्त केला आहे.हा प्रश्न मार्गी लागल्याने आ.सुरेश धस यांचे शेरीचे सरपंच संदीप खाकाळ व ग्रामस्थ यांनी आभार व्यक्त केले.
stay connected