कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी पीक नोंदणी साठी मुदत वाढ देण्यात यावी... आमदार सुरेश धस यांची मागणी

 कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान मिळण्यासाठी पीक नोंदणी साठी मुदत वाढ देण्यात यावी...
 आमदार सुरेश धस यांची मागणी 



आष्टी (प्रतिनिधी) 

सन २०२२-२३ यावर्षी फेब्रुवारी २३ मध्ये सुरुवातीला कांद्याच्या भावात मोठी घसरण झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे होणारे नुकसान कमी व्हावे यासाठी शासनाने राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५०/- रुपये अनुदान..२०० क्विंटल मर्यादेत.. देण्याचा निर्णय जाहीर केला आहे दिनांक १फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये.. संबंधित कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, थेट अनुज्ञप्ती धारक, अथवा नाफेड कडून उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रामध्ये, विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्याबाबत शासन निर्णय झालेला आहे...





 मात्र पणन संचालक महाराष्ट्र राज्य यांनी २९/०३/२०२३ रोजीच्या पत्राद्वारे.. शेतकऱ्यांच्या सातबारावर कांदा पीक नोंदणी आवश्यक आहे... अशी अट घालण्यात आल्याचे समजते..परंतु बहुतांशी शेतकऱ्यांनी सातबारावर कांदा पिकाची नोंद केली नसल्याचे निदर्शनास आलेले असून अशा प्रकारच्या नोंदणी करण्यासाठी देण्यात आलेली मुदत अल्प असून सदरील नोंदणीसाठी कालावधी वाढवून देण्यात यावा अशी मागणी आमदार सुरेश धस यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांचे कडे केली आहे..

 आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,

 कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीमध्ये..

 कृषी उत्पन्न बाजार समिती, खासगी बाजार, थेट अनुज्ञप्ती धारक, अथवा नाफेड कडून कांदा खरेदी करण्याकरता उघडण्यात आलेल्या खरेदी केंद्रामध्ये  कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना अनुदान देण्यात येणार आहे..

 तथापि,२९ मार्च २०२३ रोजी पणन संचालक,महाराष्ट्र राज्य पुणे यांनी संबंधित शेतकऱ्याच्या सातबारा वर कांदा पिकाची नोंदणी करणे आवश्यक आहे अशी अट घालण्यात आलेली आहे.. त्यासाठी बहुतांशी शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे नोंद केली नसल्याने  आणि संबंधित नोंद करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेसाठीच्या  वेबसाईट चे  सर्वर डाऊन असल्यामुळे... नोंदणी होण्यास अडचणी निर्माण होत आहेत... तलाठ्यांकडे नोंदणी करण्यास गेलेल्या शेतकऱ्यांचे काही ठिकाणी ५० टक्के तर काही ठिकाणी १५ टक्के नोंदणी झाली असून १००℅ कुठेही झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठी अडचण निर्माण झालेली आहे..

 त्यामुळे पीक कांदा ई नोंदणी करण्यासाठी देण्यात आलेली २० /०४/२०२३  ही मुदत वाढवणे आवश्यक असल्याने..

 याबाबत मा. एकनाथजी शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, मा. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याकडे पीक नोंदणी करण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी यासाठी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन देणार असल्याची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे..





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.