*शेतीमालाला रास्त भाव द्या अथवा शेतमालावरील निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवा - शिवाजी नाना नांदखिले*
-------------------
आष्टी/प्रतिनिधी
आष्टी तालुक्यातील रूईनालकोल येथे शेतकरी संघटनेची ०३मार्च सोमवार रोजी जाहीर सभा झाली. या सभेचे प्रमूख मार्गदर्शक शिवाजी नाना नांदखिले (क्रांतिसिंह नानापाटील ब्रिगेड प्रदेश अध्यक्ष)
यांनी सांगितले की, शेतकरी आत्महत्यांचे प्रमुख कारण शेतमालाला रास्त भाव मिळत नाही. २०१४ मध्ये भाजपच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना आश्वासन देऊन सांगितले गेले होते की उत्पादन खर्च अधिक ५०% जास्त हमी भाव देऊ परंतु प्रत्यक्षात तसे झाले नाही. शेतकरी जो पिक घेतो त्यांचे हमी भाव ठरवतांना सरकारने विजबिलासह इतर काही खर्च जे पिक घेतांना करावा लागतो तो ह्या हमी भावात पकडला नाही. म्हणून शेतकरी कूठलेही कर्ज व विज बील देणे लागत नाही.सरकारने शेतकऱ्यांना रास्त भाव द्यावा किंवा निर्यात बंदी कायमस्वरूपी उठवावी व शेतकऱ्यांना खूल्या बाजाराचे स्वातंत्र्य द्यावे असे सांगितले. व त्यानंतर शिवाजी नाना नांदखिले यांनी उपस्थित शेतकऱ्यांच्या अडीअडचणी ऐकून घेतल्यानंतर त्या अडचणी कायदेशिरपणे त्यावर कशी मात करता येईल यांची पुर्णपणे माहिती दिली.
यावेळी शेतकरी संघटनेचे यूवा प्रदेशाध्यक्ष हनुमंत वीर,बीड जिल्हाध्यक्ष शेख अजिमोद्दिन, बीडजिल्हा प्रसिध्दी प्रमुख रहेमान सय्यद, युवा आघाडी आष्टी तालूकाध्यक्ष बाळासाहेब गूंड, नागनाथ शिंदे दाजी,प्रा.राम बोडखे, सरपंच संजय नालकोल, रिजवान बेग,भिमा झगडे,दादा खटके,स्वप्नील थेटे आदी मान्यवर उपस्थित होते. या सभेचे आयोजन आल्हाडेदाजी,विष्णू मांढरे,कूंमकर,आदी रूईनालकोल ग्रामस्थांनी केले होते.
stay connected