*लोकाधिकार संघ व लायन्स क्लब लातूर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हरंगुळ (बु) ता. जी. लातूर येथे नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.*

 *लोकाधिकार संघ व लायन्स क्लब लातूर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हरंगुळ (बु) ता. जी. लातूर येथे नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबिर संपन्न.* 




लातूर;-लक्ष्मण कांबळे


हरंगुळ :- हरंगुळ बु येथे लोकाधिकार संघाने श्री हनुमान मंदिर देवस्थान, मंदार येथील सभागृहात आयोजित केलेले नेत्र तपासणी व नेत्र शस्त्रक्रिया शिबिराचे उद्घाटन लायन्स डॉक्टर शामसुंदरजी सोनी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून संपन्न झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरंगुळचे माजी सरपंच तथा लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे हे होते.  

शिबिरास प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे छत्रपती संभाजी राजे मंडळ अध्यक्ष ज्योतीराम चिवडे, लायन्स क्लब लातूर सेंट्रल चे अध्यक्ष प्रसाद हंचाटे, अक्षय डावरे, वाय एस शिंदे, राजेश पत्रिके, हरंगुळचे मंडल अधिकारी नागनाथ खंदाडे, तलाठी गिरीश डोईजोडे, लोकाधिकार संघाचे लातूर जिल्हा उपप्रमुख माधवराव तोंडारे, माजी सरपंच डॉ. राम गजधने, भाजपाचे लातूर शहर जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत खटके, विष्णुदास पाटे, निवृत्तीराव तीगिले, हाजीबाबा शेख, पत्रकार बाळू बुद्धे, शिवाजी कांबळे व लिंबराज पन्हाळकर हे मान्यवर उपस्थित होते.  

या कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर शामसुंदरजी सोनी, लोकाधिकारप्रमुख व्यंकटराव पनाळे, विष्णुदासजी पाटे, चंद्रकांत खटके यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष पनाळे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी गोरे यांनी केले.

शिबिर यशस्वी करण्याकरिता संभाजी गोरे, राजीव पनाळे, शिवदास बुलबुले, सुशील तिगीले, अनिल कोतवाड , भीमराव कोतवाड, हरीबा हेलाले, राम पाटील, संजय खोत, रामानंद खरोसे, ओम कोतवाड, अमोल पनाळे, प्रदीप हेलाले, अनिल माळी, ज्ञानेश्वर कोतवाड, सादिक शेख, उद्धव पनाळे, अजय शेळके, आकाश पाटील, दत्ता माळी, सूर्यकांत कीर्ते, नामदेव उपाडे, गोपाळ जटाळ, स्वप्निल माळी, गणेश कैले, करण आयलाने, शुभम तिगीले, करण शेळके, कृष्णा पनाळे, प्रदीप माळगे, मनोज जटाळ, सतीश बंडगर, रोहित बरुरे, गजानन पांढरे, राजेंद्र कैले, ओम आकारिक, दत्ता बंडगर, नरेश कोतवाड, मीनाज शेख, युवराज खरोसे, इस्माईल शेख, सोपान गुरमे, नाना तिगिले, श्याम गुरमे, तानाजी मुळे गणेश मद्दे, वैभव तिगीले, शिव कैले, बालाजी पनाळे, भागवत तिगीले, परमेश्वर पोटभरे, आशिष सगर, कपिल खंडापुरे, विठ्ठल गुरमे, संदीप हेलाले, गोविंद बंडगर, अतुल कांबळे, सागर सगर, महादेव पनाळे, सुरज पनाळे, सागर खंडापुरे, शिवसांब नागलगावे, कृष्णा सूर्यवंशी, ज्ञानेश्वर शिंदे, गौरव मेहकरे, विकास तोंडारे, योगेश खुडे, चैतन्य कांबळे, सौ.मीनाताई वाघमारे, सौ.मेघाराणी पांचाळ, सौ.आशापरी नागीमे, सौ.राजनंदिनी सरवदे, सौ. गुलाबशहा मणियार या सर्वांनी परिश्रम घेतले आहेत.

तसेच या शिबिराकरिता गहिनीनाथ कोतवाड, पुरुषोत्तम पाटे, इलाही कबाडे, बाबुराव उर्फ हनुमंत कोतवाड, परमेश्वर बंडगर, युसुफ शेख, यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.  

लोकाधिकार संघ व लायन्स क्लब लातूर सेंट्रल यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय उदगीर यांच्या सहकार्याने आयोजित शिबिराचे संतोष व्यंकटराव पनाळे व गणेश अंगदराव सगर हे आयोजक होते.

या शिबिरासाठी ९०५ लोकांनी नोंदणी केली होती. पैकी ६७० जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. यामध्ये ७९ जणांची नेत्र शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली असून त्यांना टप्प्याटप्प्यात शस्त्रक्रियेसाठी पाठवले जाणार आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३२ जणांना तात्काळ शस्त्रक्रियेकरिता उदयगिरी लायन्स आय हॉस्पिटल, उदगीर येथे पाठवण्यात आले असून उर्वरित व्यक्तींना मंगळवारी व त्यानंतर टप्प्याटप्प्याने पाठवण्यात येणार आहे.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.