संभ्रम निर्माण करणाऱ्या विरोधकांना कामातून उत्तर देऊ- माजी मंञी आ. संभाजीराव पाटील निलंगेकर
(निलंगा/प्रतिनिधी- नईम खतीब)
गेल्या पंचविस वर्षापासून आपण राजकीय क्षेञामध्ये काम करीत आहोत अनेक वेळा विरोधकानी संभ्रमाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला याला कामातून प्रतिउत्तर दिले असल्याचे मत व्यक्त करून विरोधकाकडे विकासाचा कोणताही मुद्दा नसल्यामुळे संभ्रमाचे राजकारण करत आहेत आपल्या राजकीय जीवनामध्ये विचाराशी तडजोड कधीच केली नाही व राजकारणात सेटलमेन्ट कधीच केली नाही तेव्हा येत्या काळात संभ्रम निर्माण करणाऱ्याना कामातून उत्तर देऊ असे माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यानी सांगितले.
या बैठकीला भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर,माजी आ.टी.पी.कांबळे,संजय दोरवे,तालुकाध्यक्ष शाहूराज थेटे,काशीनाथ गरीबे,मंगेश पाटील,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील,शेषराव ममाळे,अदींची प्रमुख उपस्थिती होती.
या बैठकीला निलंगा मतदार संघातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आडीच वर्षाच्या काळात सुचवलेले कामे करू शकलो नाही. लातूरच्या मंडळीकडे सत्ता गेली कसा निलंग्याच्या माणसाला त्रास देता येईल तेवढा त्यानी दिला. शहरात एक टोपली टाकण्यापुरताही निधी दिला नाही. सरकार येऊन सात महीने झाले केवळ सात महीण्यात नाही एकही गाव मतदार संघात नाही जे एक कोटीच्या खाली रक्कम नाही.प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांना दिलेला शब्द पाळला जवळपास सार्वजनिक बांधकाम विभाग आडीच वर्षात साडेसात कोटीपैकी आडीच कोटी दिले.
आता १३५ कोटी रूपये रस्त्यासाठी काँग्रेस वाल्यांना आव्हाण आहे. काय निधी दिला सांगावा शहरातील सर्व रस्ते सुरू आहेत. २५ कोटी रूपये निधी दिला. आरोग्य खात्यासाठी ४५ कोटी दिले. काँग्रेसवाल्यांनी ४५ लाखही दिले नाही. मुलभूत सुविधा पाण्यासाठी
निलंगा शहराचा आडीच वर्षाचा अनुशेष ३० दिवसात भरून काढला नाहीतर राजकारण सोडून बाहेर पडू लातूरमधील पाणी, मुतारी देशमुखांना करता आल्या नाहीत महिलांच्या अडाणी पहाता आम्ही हे कामे अगोदर केले असा टोला देशमुखांना आमदार निलंगेकर यानी लगावला आम्ही विकासाचे राजकारण करतो परंतु देशमुख हे मला संपवण्यासाठी राजकारण करत आहेत.असे निलंगेकर शेवटी म्हणाले.
चौकट....
बाजार समितीच्या पॕनलला कर्मयोगी डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर परीवर्तन असे नाव द्या भाजपा कार्यकर्त्यांची सर्वमुखी मागणी
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पॕनलला कर्मयोगी डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे नाव द्या अशी सर्वमुखी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी बैठकी मध्ये केली आहे.
निलंगा ,औराद शाहजनी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकाचे बिगूल वाजले असून येणाऱ्या ३० एप्रिल रोजी दोन्ही बाजार समितीचे मतदान होणार आहे.निलंगा बाजार समितीच्या १८ जागेसाठी ११२ तर औराद शाहजनी येथील बाजार समितीमध्ये १८ जागेसाठी ११९ उमेदवारी अर्ज आले असून महाविकास आघाडीतील काँग्रेस,राष्ट्रवादी,शिवसेना,एका बाजूला तर एकटी भारतीय जणता पार्टी मोठ्या ताकदिने ताकदिने निवडणूक रिंगणात उभी असून दोन्ही ठिकाणच्या बाजार समितीच्या पॕनलला कर्मयोग डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर परीवर्तन पॕनल हे नाव देण्याचा संकल्प संपूर्ण भारतीय जणता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे.
stay connected