*भारत स्वतंत्र ७५ वर्ष झाले तरी साकत गावला पुल मिळेना...!*
नगर प्रतिनिधी:-
भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्ष झाले आहे.पण आज देखील दोन गावच्या मध्यभागी असलेली सिना नदी वर पुल होत नाही. या साकत बुद्रुक ता.आष्टी जिल्हा बीड, साकत खुर्द ता.नगर जिल्हा अहमदनगर अशा दोन गावांच्या मध्ये सिना नदी आहे साकत बुद्रुक हे आष्टी तालुका हद्दी शेवटचे गाव आहे.या गावातील विद्यार्थी, जेष्ठा नागरिक, या गावातील वैद्यकीय सेवे साठी अहमदनगर या ठिकाणी जावं लागतं शेती माल नेण्यासाठी बाजपेठा या सर्व नगर हद्दी येतात
परंतु आज गावातील सर्व नागरिकांनी मिळून शेवटी स्वखर्चाने पुलाचे काम करायचे ठरवले आणि आज नारळ फोडण्याचा कार्यक्रम पार पाडला.
या कार्यक्रमासाठी साकत बुद्रुक गावचे सरपंच ज्ञानदेव सासवडे, उपसरपंच प्रदीप गुंड, संतोष गुंड, दहिगावचे माजी सरपंच मधुकर म्हस्के, साकत खुर्द सरपंच बाळासाहेब चितळकर चेरमन बाबासाहेब थोरात,दादासाहेब शिंदे,माजी चेअरमन अशोक शिंदे चेरमन,अजिनाथ थोरात सर, बाळासाहेब भोगाडे, सतीश आरुणे, महादेव भोगाडे, शंकर भोगाडे, चंदु गुंड, अशोक भोगाडे, सोपान भोगाडे, अर्जुन भोगाडे, पोपट गुंड, भाऊसाहेब लाळगे,प्रवीण सासवडे, शुभम भोगाडे, शरद आरुणे,उत्तम साठे, सोमनाथ भोगाडे, बाळासाहेब थोरात, रामदास भोगाडे, पंढरीनाथ भोगाडे, सूर्यभान भोगाडे, पोपट भोगाडे,कल्याण गुंड, अमोल भोगाडे, दादा जाधव,राहुल आरुणे आदी ग्रामस्था या वेळी उपस्थित होते.
stay connected