निलंग्यात विर सावरकर गौरव याञा...माजी मंञी आ.निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती
( निलंगा/प्रतिनिधी :- नईम खतीब )
माजी मंञी आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत निलंगा शहरात विर सावरकर गौरव याञा काढण्यात आली.
निलंगा शहरात दिनांक ६ रोजी सांयकाळी ६ वाजता भारतीय जणता पार्टी व शिवसेना रिपाई पदाधिका-यांच्या उपस्थितीत भारतीय जणता पार्टीच्या जण संपर्क कार्यालयासमोर भारतीय जणता पार्टी स्थापना दिवसानिमित्त ध्वजारोहन करून या विर सावकरकर गौरव याञेला सुरवात करण्यात आली.विर सावरकरांच्या वजनांचे फलक मी सावरकर अशी लिहलेली भगवी टोपी घालून शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते छञपती शिवाजी महाराज चौक ते देवीचे मंदिर अशी पदयाञा काढण्यात आली होती.भारत माता जय अशा घोषणा कार्यकर्ते मौठ्यानी देत पदयाञेत सामील झाले होते.सदरील याञेची सांगता शिवाजी नगर येथील देवीच्या मंदिरात आरती करून सांगता करण्यात आली.
या याञेत भाजपा प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर,माजी आमदार टी.पी.कांबळे,माजी जि.प.अध्यक्ष मिलिंद लातूरे,भाजपा तालुकाअध्यक्ष शाहूराज थेटे,काशीनाथ गरीबे,मंगेश पाटील,शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख सुधीर पाटील,तालुकाप्रमुख भगवान जाधव,आरपीआयचे आंकूश ढेरे,संजय दोरवे,शेषराव ममाळे,चेअरमन दगडू सोळुंके,गुंडेराव जाधव,राजा पाटील,लालासाहेब देशमुख,सह जि.प.सदस्य,प.स.सदस्य,माजी नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
stay connected