कडा येथील आकाश बापु भाकरे या युवकाची आत्महत्या.

 कडा येथील आकाश बापु भाकरे या युवकाची आत्महत्या.





कडा /प्रतिनिधी.


आष्टी तालुक्यातील कडा येथील युवक आकाश बापु  भाकरे या युवकानी  आत्महत्या केली .

आकाश बापु भाकरे या युवकाने सासु सुनेचा माळ कडा व देविनिमगांव या दोन्ही हद्दी च्या मध्ये बाभळीच्या झाडाला नाईट पेंन्टच्या साह्याने गळफास घेउन आत्महत्या केली व आपली जिवन  यात्रा संपवली मृत्यु समयी त्यांचे वय 24 वर्षे होते अंभोरा पोलीस ठाणे येथील पि एस आय फडके साहेब यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून त्या ठिकाणी 2एप्रिल 2023सांयकाळी7.30 वाजता मृत्यदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला व कडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र कडा येथे श्वासविच्छेदन साठी ठेवण्यात आले . व 11वाजता त्यांचा अंत्यविधी करण्यात आला

त्याचे मुळ गांव भुम तालुक्या मध्ये होते .

आई लहानपणी मयत झाल्यामुळे त्यांचे मामा संजय हजारे व राजेंद्र हजारे यांच्याकडे राहत होता प्लंबिंग चे काम करत असे त्याचा कडा येथे अनेक मित्र परीवार होता त्याच्या जाण्याने  कडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मयताचे कारण अद्याप समजले नाही असे पि एस आय फडके यांनी सांगितले.




टिप्पणी पोस्ट करा

1 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

stay connected