*समाज घडवण्याचं काम मुळे आबांनी केलं --आ. साहेबराव दरेकर*

 (स्व . माधवराव मुळे प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार व आदी अभिनव उपक्रम)


 *समाज घडवण्याचं काम मुळे आबांनी केलं --आ. साहेबराव दरेकर* 



नगर -- शिक्षणमहर्षी माधवरावजी मुळे आबा आयुष्यभर आपल्या विचार व  तत्वांशी एकनिष्ठ राहिले, समाजात आज सकस व वैचारिक विचारांची बैठक असणं फार गरजेचं आहे असं आबा नेहमी सांगत असत, आपला भारत देश कृषिप्रधान असून  आपली नाळ ही शेतीमातीशी जोडली असणं फार महत्त्वाचं आहे. राजकीय, कृषी, उद्योग ,शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आबांनी काम करून समाज घडविण्याचे काम मुळे आबांनी केलं असे प्रतिपादन शिक्षणमहर्षी माधवरावजी मुळे जीवन गौरव पुरस्कार स्वीकारताना आमदार साहेबराव दरेकर नाना यांनी केले.

                     स्व. माधवराव दगडूजी मुळे प्रतिष्ठान अहमदनगर यांच्या वतीने मुळे आबांचे चौथे पुण्यस्मरण तसेच वार्षिक सर्वसाधारण सभा आणि शिक्षणमहर्षी माधवरावजी मुळे जीवनगौरव पुरस्कार 2023 चे वितरण नुकतेच यश ग्रँड हॉटेल येथील सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाले .यावेळी प्रतिष्ठानची  वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली. त्यानंतर जीवनगौरव पुरस्कार वितरण सोहळ्याला सुरुवात होऊन विचारपीठावर पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज शिक्षण संस्थेचे सहसचिव व ज्येष्ठ विधीतज्ञ अॅड. विश्वासराव आठरे पाटील होते .पुरस्कार वितरण यांच्या शुभहस्ते संपन्न झाला असे प्रमुख अतिथी आमदार संग्राम भैय्या जगताप ,पुरस्कारार्थी आमदार साहेबराव दरेकर नाना ,समवेत प्रतिष्ठांचे अध्यक्ष मुकेश माधवराव मुळे, उपाध्यक्ष दत्ता पाटील नारळे सचिव प्राचार्य एम. एम. तांबे, डॉ. महेश मुळे, प्रा. लालचंद हराळ बजरंग पाडळकर, प्रा गणेश भगत, सुनील म्हस्के. नीलम काळदाते , सुधाकर सुंबे  प्राचार्य विजयकुमार पोकळे, अॅड. सुभाष भोर आदी मान्यवर उपस्थित होते .

यावेळी आबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले उपस्थितांचे स्वागत प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुकेश मुळे यांनी केले. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एम. एम .तांबे यांनी केले. मान्यवरांच्या शुभहस्ते आमदार साहेबराव दरेकर नाना यांना शिक्षणमहर्षी माधवरावजी मुळे जीवनगौरव पुरस्कार 2023 मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला .यावेळी मानपत्र वाचन प्रा. डॉ. रामदास टेकाळे यांनी केले. याप्रसंगी आमदार निलेश लंके संपतराव म्हस्के. बाळासाहेब हराळ, संदेश कारले, रघुनाथ झिने. ज्ञानदेव पांडुळे मंत्री किसनराव लोटके. अंकुश शेळके आप्पासाहेब शिंदे. सौ कल्पना दारकुंडे आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शविली .


      यावेळी आमदार संग्राम भैय्या जगताप बोलताना म्हणाले की- आबांच्या विचारांचा वारसा जपण्यासाठी आपण आज एकत्र जमलो आहोत ,आबांचं कार्य पुढे चालवणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो ही अभिमानाची गोष्ट आहे. आबांच्या पुढाकाराने अनेक लोक शिकले व पुढे गेले त्यामुळे आबांचे योगदान समाजासाठी फार मोठे मोलाचे आहे असे प्रतिपादन जगताप यांनी केले . 

         जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना आमदार साहेबराव दरेकर नाना म्हणाले की मला मिळालेला हा पुरस्कार माझ्या सद्गुरूचा प्रसाद आहे .तो मी आदर भावाने स्वीकारतो समाजाने त्यांच्या विचार कार्याचा वारसा जपावा अशी अपेक्षा पुरस्काराला उत्तर देताना साहेबराव दरेकर नाना यांनी व्यक्त केली. 

     अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना ज्येष्ठ विधीतज्ञ अॅड. विश्वासराव आठरे पाटील म्हणाले की बहुजन समाज समृद्ध होणं गरजेचं आहे, हा आबांचा विचार व शैक्षणिक चळवळ आपण पुढे समर्थपणे घेऊन जाणं काळाची गरज आहे. बहुजन समाजाने शेती सोबत आबांप्रमाणेच उद्योजकतेचा स्वीकार करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना त्यांनी केले.

     कार्यक्रमाचे आभार प्रा.लालचंद हराळ यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा गणेश भगत यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेश मुळे, संतोष आव्हाड, सिताराम मुळे ,जगन्नाथ नारळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व सभासद व आबांवर प्रेम करणारे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.