आष्टी येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले जयंतीनिमित्त १०५ रक्तदात्यांनी केले रक्तदान
-------------------
आष्टी। प्रतिनिधी
आष्टी शहरातील सामाजिक संस्था रावण सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त आष्टी येथील ॲड बी डी हंबर्डे महाविद्यालयात आयोजित करण्यात आले होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्राचार्य डॉ सोपानराव निंभोरे, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत चाटे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रा रवि सातभाई, आष्टी तालुका युवा पत्रकार संघाचे अध्यक्ष अविनाश कदम, ॲड किशोर निकाळजे आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी रक्तदान शिबिरामध्ये एकुण १०५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
आष्टी शहरात सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी रावण सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या वतीने रविवारी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरामध्ये १०५ युवक रक्तदात्यांनी रक्तदान केले.कमला भवानी ब्लड सेंटर बँक करमाळा यांचे डाॅ तेजस धस, उमाकांत उबरे, ओंकार मिरगे,राधिका सरडे यांनी रक्तदान घेण्यासाठी परिश्रम घेतले. रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी रावण सोशल फाउंडेशन महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सुहास पगारे,तालुका संघटक निखिल शिंदे,तालुकाध्यक्ष मोहित कांबळे,
तालुका उपाध्यक्ष विजय शिंदे,
व रावण सोशल फाउंडेशनचे पदाधिकारी व सदस्य यांनी परिश्रम घेतले.
stay connected