गटविकास अधिकारी नागरगोजेंचे परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम. ... एमआरईजीएस च्या विकास कामात वडवणी पंचायत समिती टाॅपवर..

 गटविकास अधिकारी नागरगोजेंचे परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम.
...  
एमआरईजीएस च्या विकास कामात वडवणी पंचायत समिती टाॅपवर..
- नऊ महिन्यात चार कोटींचा खर्च..
- आगामी वर्षात आठ कोटींचे टार्गेट.



दोनशे विहिरींचे कामे पुर्ण.


- अठ्ठेचाळीस लाखांच्या बिलांची आँनलाईन कामे पुर्ण. 


वडवणी प्रतिनिधी 


वडवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांच्या नियोजनबद्ध आराखड्यानुसार वडवणी पंचायत समितीच्या वतीने महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत विकास कामात उच्चांक गाठला असल्याने ही पंचायत समिती याकामी टाॅपवर आली आहे.


याबाबत अधिक वृत्त असे की, वडवणी पंचायत समिती कार्यालयाच्या माध्यमातून तालुक्यातील ग्रामीण भागातील महात्मा गांधी रोजगार हमी योजनेची कामे युद्धपातळीवर राबविली जावीत म्हणून येथील गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने सर्वेक्षण करून पंचायत समिती कार्यालयात प्रस्ताव सादर करण्याचे संबंधित कर्मचाऱ्यांना आदेशित केले होते.वडवणी तालुक्यात 36 ग्रामपंचायत अंतर्गत 42 गावे/वाड्या/वस्त्या/तांडे आहेत.या ठिकाणच्या शेतकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्य जनतेला आपल्या हक्काचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न केले गेले.तालुक्यातील अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाला आपल्या शेतातील पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी या योजनेअंतर्गत नवीन विहीर दिली जाते.यासाठी शेतकऱ्यांकडून रितसर अर्ज दाखल करुन घेतली व सन 2022 - 2023 या वर्षात 200 विहिरींचे वाटप करण्यात आले.त्याच बरोबर काही शेतकऱ्यांनी या योजनेअंतर्गत वृक्ष लागवड ही केली आहे.तर काही गोरगरीब कुटुंबातील पात्र लाभार्थींना घरकुल

बांधकामासाठी ही निधी वाटप केला असल्याची माहिती गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी सांगितली.



..


नऊ महिन्यात उच्चांकी खर्च झाला असून विहीर गायगोटे व रस्ते, घरकुल या साठी  चार कोटी चा खर्च केला आहे.


 

..

आगामी वर्षात याच योजनेअंतर्गत नवीन कामांसाठी आठ कोटींचे टार्गेट असल्याचे गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांनी सांगितले.



...

सन २०२२ - २०२३ अखेर जवळपास चार कोटी दहा लाखाचा यावर खर्च झाला असून 48 लाखांची बिले सध्या ऑनलाईन झाली आहेत. तेही लवकरच लाभार्थ्यांना मिळतील.




..

वडवणी पंचायत समिती अंतर्गत महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमध्ये

2014 -  2015 मध्ये दोन कोटी 17 लाख

2015  - 2016 मध्ये दोन कोटी 78 लाख

2016  - 2017 मध्ये तीन कोटी 99 लाख

2017 -  2018 मध्ये दोन कोटी 85 लाख

2018  - 2019 मध्ये तीन कोटी 43 लाख

2019 -  2020 मध्ये दोन कोटी 91 लाख 

2020 -  2021 मध्ये एक कोटी 66 लाख

2021 -  2022 मध्ये एक कोटी 11 लाख

2022 - 2023  मध्ये तीन कोटी 62 लाख

अशा प्रकारे वर्ष निहाय निधी उपलब्ध झाला आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.