Newasa :जनकल्याण फाउंडेशन आयोजित संत तुकडोजी महाराज सन २०२३ पुरस्कार जाहीर










नेवासा जि. अहमदनगर :(प्रतिनिधी)

जनकल्याण फाउंडेशन,गोंडेगाव ता. नेवासा च्या वतीने २०२३ चे संत तुकडोजी महाराज पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले असुन रविवार  दि. ३० एप्रिल  रोजी सायंकाळी ६ वाजता मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष पांडुरंग रोडगे यांनी दिली. 

यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी   माजी जि. प. अध्यक्ष अरुण पाटील कडू राहाणार असून शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी  यांचे शुभ हस्ते पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य चे प्रमुख मार्गदर्शक काँ.बाबा आरगडे उपस्थित असणार आहेत.

सामाजिक क्षेत्रातील श्री. रावसाहेब मगर [ शरणपूर वृद्धाश्रम,नेवासा ] 

साहित्यिक सुभाष सोनवणे, [ सेवानिवृत्त पोलीस अधिकारी ],

आरोग्य सेविका - सौ.रोहिणी चंद्रकांत जाधव [ उपकेंद्र चिलेखनवाडी प्रा.आ.केंद्र कुकाना ],

कृषीभूषण भगवान मरकड [ मढी ता.पाथर्डी ]

पत्रकारिता राजेंद्र देसाई, गृहरक्षक दल  [ वडाळा महादेव ता.श्रीरामपूर ]

समाज भूषण  सुखदेव फुलारी ( पत्रकारिता मृदू व जलसंधारण वृक्ष संवर्धन कार्यातील कामगिरी)

 बद्दल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत तसेच यावेळी

 विशेष पुरस्कार

कलावंत -शिवशाहीर अक्षय डांगरे 

आदर्श शिक्षिका - सौ.अनिता अशोक कानडे 

ग्रंथपाल अनिल सरोदे 

गुणवत्ता सत्कारमूर्ती 

राज्य कर निरिक्षक अमोलअशोक धुमाळ व  राहुल शिवाजी शेरकर, कु ऐश्वर्या दीपक नवले [ भु कर मापक भूमि अभिलेख,अमरावती विभाग ]  यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कृत करणार असल्याची माहिती अध्यक्ष पांडुरंग रोडगे यांनी दिली आहे.

   या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे आयोजन जनकल्याण फाउंडेशन, गोंडेगाव तसेच जनकल्याण सार्वजनिक वाचनालय,गोंडेगाव अध्यक्ष पांडुरंग विठोबा रोडगे व सुरेश रामभाऊ रोडगे यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले आहे. गोंडेगावं ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात सदर कार्यक्रम होणार आहे.






Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.