आष्टी तालुक्यात वादळी पावसात विज कोसळून दोन महिलांचा मृत्यु तर तीन बैल ठार !

आष्टी तालुक्यात वादळी पावसात विज कोसळून दोन महिलांचा मृत्यु तर तीन बैल ठार !







आज दि. १९ एप्रिल रोजी सायं. आष्टी तालुक्यात सर्वदूर विजांच्या कडकडासह वादळ सुरू झाले आहे, यामध्ये सौ. काजल विकास माळी वय -२३ रा.केरुळ व सौ. ताई संदीपान सावंत रा.सांगवी आष्टी ह्या माहेरी हिंगणी येथे वडिलांकडे गेल्या असताना अंगावर वीज पडुन दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या दोन घटना घडल्या आहेत,पारगाव जो. येथील संतोष बोराडे यांची बैलजोडी, तसेच शिरुर का. तालुक्यातील भडखेल येथील शेतकरी मधुकर आहेर यांचा एक बैल वीज पडुन मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे .

  आष्टी पाटोदा शिरूर तरी मतदार संघातील नागरिकांना विनंती आहे, की पुढील दोन दिवस पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता हवामान खाते व पंजाबराव डख यांनी सांगितली आहे, सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की सध्याची परिस्थिती पाहता वातावरण खूप खराब असून वादळी वाऱ्यासह गाराचा पाऊस येण्याची, विज कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी सर्व बांधवांनी आपली स्वतःची व आपल्या जनावरांची काळजी घ्यावी असे आवाहन  आमदार सुरेश धस यांनी केले आहे .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.