महाराष्ट्राचे काव्यसम्राट कवी प्रेम पवळ यांचा सालाबादप्रमाणे निर्धार मुलांसोबत वाढदिवस साजरा...

 महाराष्ट्राचे काव्यसम्राट कवी प्रेम पवळ यांचा सालाबादप्रमाणे निर्धार मुलांसोबत वाढदिवस साजरा...




आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा येथील रहिवाशी आणि प्रेमकवी या नावाने सर्व महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेले साहित्यिक प्रितम सोन्याबापू पवळ यांचा वाढदिवस अतिशय अनुकरणीय व आदर्श पद्धतीने अंकुर बालविकास केंद्र या ठिकाणी साजरा करण्यात आला.हॉटेल मध्ये पार्टी , जेवण , प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी साठी विनाकारण होणारी पैशांची नासाडी आणि या सर्वातून फल निष्पती शून्य असा निरर्थक आणि माणूसकी शून्य वाढदिवस साजरा न करता समाजपयोगी आणि वंचित घटकांना काहीतरी दिलासा मिळेल किंवा हातभार लागेल.असा वाढदिवस साजरा करण्याचा प्रितम सोन्याबापू पवळ यांनी पूर्वीच बोलून दाखवला होता. हे त्यांचे आदर्श विचार.        



 सर यांना समजताच त्यांनी अनाथ आश्रमामध्ये वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना सांगितली , आणि प्रितम(प्रेम) पवळ यांना हि संकल्पना तात्काळ आवडलीच नाही तर त्यांनी ती अमलात आणली. या प्रसंगी प्रितम पवळ यांनी आश्रमातील सर्व मुलांना जेवण, केक, चॉकलेट स्वतःच्या हाताने वाटप केले. त्याचप्रमाणे आश्रमाचे अध्यक्ष.  यांना भविष्यात नेहमीच आश्रमांसाठी योगदान देण्याचे वचन दिले.

या प्रसंगी हुसेन बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य संचालक अध्यक्ष रशीद शेख (सर),क्राईम बॉर्डर मुख्य संपादक राजेंद्र वखरे व त्यांची पत्नी सिमा वखरे, महाराष्ट्राचे पहाडी गायक लक्ष्मण माळी,सुद्दाम भुईर (शिवसेना ग्रामीण प्रमुख मुरबाड), शेषराव शेकडे,सुमीत घोडके,प्रतिक पवळ, प्रशांत तळेकर,हनुमान शेकडे,अंकुर बाल विकास केंद्र च्या अध्यक्षा अक्षदा अभय भोसले व  सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.