तुकाराम बीजे निमित्त कुंबेफळ येथे ह.भ.प.गाडे महाराज यांची सुश्राव्य किर्तन सेवा.
आष्टी तालुक्यातील कुंबेफळ येथे तुकाराम बीजे निमित्त तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते.व त्या पारायण सोहळ्याच्या आठव्या दिवसाची म्हणजे आज "तुकाराम बीज" निमित्त कुंबेफळ गावचे भुषण अखिल भारतीय वारकरी सांप्रदायाचे वारकरी धर्म प्रसारक आदर्णीय ह.भ.प रखमाजी गाडे (महाराज ) यांनी जगद्गुरु वैराग्य मुर्ती श्री संत शिरोमणी तुकाराम महाराज यांच्या, चरणांचा अंभग, आम्ही जातो तुम्ही कृपा असु द्यावी...... सकळा सांगावी विनंती माझी..... आमच्यावर कृपा असु द्यावी.....या तीन चरनांच्या अंभगावर सुश्राव्य असे किर्तन केले. त्याच बरोबर गावातील सर्व भजनी मंडळाचे व सर्व ग्रामस्थांचे ही कार्यक्रमाला विशेष असे सहकार्य लाभले. व नंतर सर्व कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर महाप्रसादाची पंगत- अभिजीत शिवाजी जंजीरे,व गणेश आसाराम गाडे यांच्या वतीने करण्यात आली होती. अशा पद्धतीने कुंबेफळ येथे तुकाराम बीजेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात व आनंदात संपन्न झाला .
stay connected