आष्टी फार्मसी कॉलेजमध्ये महिलांना सन्मानित करून जागतिक महिला दिन साजरा
आष्टी प्रतिनिधी
आष्टी येथील आनंद चॅरिटेबल संस्था संचलित डी व बी फार्मसी कॉलेजमध्ये 8 मार्च जागतिक महिला दिन महिलांना सन्मानित करून साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला अध्यक्ष स्थानी डॉ. राहुल टेकाडे अधीक्षक ग्रामीण रुग्णालय आष्टी तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.डी बी राऊत सर डॉ. संतोष जावळे डॉ. शोभा टकले स्री रोग तज्ञ ग्रामीण रुग्णालय आष्टी हे लाभले. डॉ.राहुल टेकडे यांनी आपल्या भाषणांमधून सांगितले की कुटुंब व समाज चांगला घडवण्याचे काम ही महिलाच करते महिला आपल्या कुटुंबासाठी नेहमी मेहनत करते व त्यातूनच चांगला समाज घडतो असे मत व्यक्त केले. डॉ. शोभा टकले यांनी महिला कर्मचारी व विद्यार्थिनींनीना आरोग्य विषयी येत असलेल्या समस्या व त्यावर काय उपाय योजना करायचा तसेच महिलांनी विद्यार्थिनींनी आपले आरोग्य कसे सांभाळायचे याविषयी व्याख्यानपर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे डॉ. डी बी राऊत सर यांच्या हस्ते कॉलेजच्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. विद्यार्थिनींनी वेगवेगळ्या थोर महिलांचे वेशभूषा करून थोर महिलांची कर्तव्यांची व विचारांची माहिती दिली.
या कार्यक्रमाचे सर्व आयोजन व सूत्रसंचालन प्राध्यापक प्रीतम धोंडे सर प्राध्यापिका अश्विनी बनकर मॅडम यांनी केले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्व उपस्थितांचे आभार कॉलेजचे प्राचार्य डॉ. सुनील कोल्हे यांनी मानले.
stay connected