*मनी वाइज वित्तीय साक्षाता केंद्र केज अंतर्गत ढाकेफळ येथे लिंकेज कॅम्प संपन्न*

 *मनी वाइज वित्तीय साक्षाता केंद्र केज अंतर्गत ढाकेफळ येथे लिंकेज कॅम्प संपन्न*

==========================


केज (प्रतिनिधी) दि १५ रोजी ढाकेफळ येथे मनिवाईज वित्तीय साक्षरता केंद्र केज अंतर्गत ढाकेफळ येथे महाराष्ट्र ग्रामीण बॅंक यांच्या मार्फत लिंकेज कॅम्प आयोजित करण्यात आला होता...

सदरील माहिती अशी की, भारतीय रिझर्व्ह बँक,बॅंक ऑफ महाराष्ट्रा व क्रिशील फाउंडेशन यांच्या माध्यमातून केज तालुक्यातील सर्व गावांमध्ये आर्थिक साक्षरता जनजागृती करण्याचे काम क्रिशील फाउंडेशन यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.आज ढाकेफळ येथे लिंकेज कॅम्प आयोजित करण्यात आला होता. या वेळी महाराष्ट्र ग्रामीण बॅंक मॅनेजर जितेंद्र मुराडे सर, दिनेश वाघमारे, सेवक विष्णू सौदागर,बी सी चे शामराव थोरात व क्रिशील फाउंडेशन सेंटर मॅनेजर ॠषीकेश टाकनखार, सरपंच, उपसरपंच व सदस्य सर उपस्थित होते.टाकनखार यांनी उपस्थित यांना भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या विविध योजना विषयी माहिती सांगितली त्यामध्ये बचत व गुंतवणूक, अटल पेन्शन योजना,जिवन ज्योती योजना, प्रधानमंत्री विमा योजना,कर्ज व लोन,तसेच डिजिटल व्यवहार या विषयी माहिती सांगण्यात आली. तसेच बॅंक मॅनेजर यांनी विशेष सुविधा व योजना विषयी माहिती सांगितली.व गावातील नागरिकांनी विमा काढुन घेतला यावेळी गावातील सरपंच रतन अंधारे, उपसरपंच गोपाळ थोरात, सदस्य अरविंद थोरात, गणेश घाडगे व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रंजीत घाडगे, प्रविण थोरात यांनी परिश्रम घेतले. मनीवाइज वित्तीय साक्षरता केंद्र केज तालुका समन्वयक घाडगे रंजीत यांनी सुत्रसंचलन व आभार माणून कार्यक्रम यशस्वी पार पडला...





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.