आष्टी तालुका येथील पुरवठा विभागाची चौकशी करून संबंधीत दोषीवर कारवाई करण्याची मागणी .. रवि काका ढोबळे .
अनिल मोरे / कडा .
आष्टी तालुक्यात धान्य पुरवठा विभागाकडून मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार सुरु असुन आष्टी तालुक्यातील जे व्यक्ती मयत आहे त्याच्या नावावर माल पुरवठा विभागाकडून उचलला जातो . याची कोणीही दखल घेत नाही शासनाकडून 50 किलो वजनाची गोणी येते तरी त्या गोणी मधुन2 ते 3 किलो धान्य कमी केले जाते म्हणजे ती गोणी 47 ते 48 किलो भरली जाते .
राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रवी काका ढोबळे यांनी मा . विभागीय आयुक्त सुनिल . केंद्रेकर साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन द्वारे सांगितले की आष्टी व कडा धान्य पुरवठा विभागाकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे . तरी आयुक्तानी आष्टी तहसीलदार यांना सांगितले की आष्टी व कडा या ठिकाणी जाऊन गोणी ही ५० किलोची आहे का नाही ती गोणी मोजुन त्यामध्ये काही तफावत आढल्यास चौकशी करून संबंधित दोषी अधिकार्यावर कारवाई करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले आहेत .
stay connected