भविष्यात पाणीबाणी टाळण्यासाठी 'जल धडक" मोर्चात सहभागी व्हा:- डाॅ.गणेश ढवळे
___
बीड जिल्ह्य़ातील जलजीवन मिशन योजनेंतर्गत मोठ्याप्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाला असून जिल्हापरिषद विभागातील वरिष्ठ आधिकारी, कंत्राटदार व स्थानिक पुढारी यांनी संगनमतानेच थातूरमातूर काम करून निधी लाटण्याचा प्रयत्न सुरू असून संबधित प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते यांच्या निवेदन तसेच आंदोलनानंतर सुद्धा कारवाई आर्थिक लाभातुन टाळाटाळ होत असून संबधित प्रकरणात जबाबदार आधिकारी-कंत्राटदारांवर कारवाईसाठी ऊद्या दि.१६ फेब्रुवारी गुरूवार रोजी राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हाध्यक्ष विजयसिंह ऊर्फ बाळा बांगर यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजीमहाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय "जल धडक "मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केले आहे.
बनकरंजा प्रकरणात जबाबदार आधिका-यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी नुतन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंढे यांना निवेदन
___
केज तालुक्यातील मौजे. बनकरंजा येथील जलजीवन मिशन अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी नेमलेल्या उपआयुक्त तसेच जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी नेमलेल्या तत्कालीन अपर जिल्हाधिकारी अंबाजोगाई मंजुषा मिसकर यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीत अनियमिततेबद्दल तत्कालीन कार्यकारी अभियंता नामदेव उबाळे, निविदा शाखाप्रमुख शिवाजी चव्हाण, जलजीवन मिशनचे एल. आर. वासनिक, प्रभारी कार्यकारी अभियंता ए.यु. खंदारे यांनी अनियमितता करत निविदा मर्जीतील ठेकेदारांना वाटप केल्यावरून गंभीर आक्षेप नोंदवून कंत्राटदार तसेच अभियंत्यांवर थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची शिफारस केलेली असताना मुख्य कार्यकारी आधिकारी जिल्हापरिषद बीड अजित पवार यांनी केवळ कंत्राटदारांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देऊन आधिका-यांची पाठराखण केली असून संबधित प्रकरणात त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी मागणी नुतन जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंढे यांना लेखी निवेदनाद्वारे केली असून या निवेदनावर बीड जिल्हाध्यक्ष शेख युनुस च-हाटकर, तालुका संघटक मुश्ताक शेख, बलभीम उबाळे आदिंच्या स्वाक्षरी आहेत.
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर
मो.नं.८१८०९२७५७२
stay connected