आई
उन्हामध्ये चालताना
सावली माझ्या सोबत होती
पांघरली तिने शाल उन्हाची
झळ उन्हाची मला लागू देत नव्हती
वाटेवरून चालताना
पदरामागे मला लपवलं होतं
मोडले कित्येक काटे पायामध्ये
काट्यानंवरून चालताना ही मला जपलं होतं
गवसणी घालण्याचा आकाशाला झेलून मला धरलं होतं
उंच उडालो पतंगापरी मी
मांजात स्वतःला तिने गोवलं होतं
मोडलेली जीवनाची घडी
कष्टाने सावरली होती
पोटात अन्नाचा कण जाण्या माझ्या
स्वतःची भूक तिने मारली होती
विसावलो मी आयुष्यात
स्वर्गसुखाची अनुभूती ती घेत होती
आई तुझ्याविना माझी
झोळी रीतीच राहिली असती
-Navjee "ध्रुवतारा"


stay connected