नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वामिनिष्ठ व स्वराज्याच्या शौर्यात्मक इतिहासातील एक सुवर्णपान
आम्रपाली धेंडे
अतुलनीय शौर्य, साहस आणि असीम त्यागाचे प्रतिक असलेल्या सुभेदारांनी आपल्या मुलाच्या ही लग्नाचा विचार न करता दि. ४ फेब्रुवारी १६७० रोजी 'सिंहगड' घेताना आपला देह रयतेच्या स्वराज्यासाठी अर्पण केला. तेव्हा तानाजीरावांचे हे अत्युच्च बलिदान स्मरून खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या नित्य वापरातील पवित्र कवड्यांची माळ सुभेदारांच्या देहावर अर्पण केली होती.
दि. ४ फेब्रुवारी २०२३ रोजी म्हणजेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या' या पवित्र माळेचे प्रत्यक्ष दर्शन *छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिव्हल २०२३* च्या निमित्ताने मुंबईकरांना घेण्याचे भाग्य लाभत आहे.या दिवशी मालुसरे घराण्याच्या वंशज डॉ. शितलताई मालुसरे देखील उपस्थित राहणार आहेत.


stay connected