*बीड जिल्ह्याचे सुपुत्र डॉ.शुभम मुंडे यांची गरूडझेप*

 *बीड जिल्ह्याचे सुपुत्र  डॉ.शुभम मुंडे  यांची गरूडझेप*



बीड/प्रतिनिधी 


महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन मुंबई येथे राज्यभरातील दंतचिकित्सकांना 'एक्सलन्स इन डेन्टिस्ट्री' पुरस्कार प्रदान करण्यात आला. 

बीड शहरातील दत्तनगर भागात राहणारे युवाउद्योजक 'डॉ.शुभम मुंडे' यांच्या दंतचिकित्सकांच्या "मेडियुष" या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. 


महाराष्ट्र शासनाच्या 'स्वच्छ मुख अभियान'च्या लोगो आणि टॅगलाइनचेही राज्यपालांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 


या कार्यक्रमात डॉ.शुभम यांना 'युथ आयकॉन ऑफ ईयर' या पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आले.

संस्थापक डॉ.विश्वेश ठाकरे , सोमेश माने, मेडियुष सहसंस्थापक डॉ गोविंद भताने, सीएफओ शुभम लामगे,वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ विवेक पाखमोडे, इंडियन डेंटल असोसिएशनचे डॉ अशोक ढोबळे, सौंदर्य व सौंदर्यवर्धक दंततज्ज्ञ डॉ संदेश मयेकर, डॉ दर्शन दक्षिणदास आणि दंतचिकित्सा क्षेत्रातील डॉक्टर आणि तज्ञ उपस्थित होते.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.