*शेतकऱ्यांच्या वाट्याला स्वातंत्र्य आलेच नाही*
दैठण्याच्या सभेत अमर हबीब
परभणी-
महात्मा गांधीनी शेतकऱ्यांना सैबत घेऊन स्वातंत्र्याचे आंदोलन लढले, परंतु स्वातंत्र्यानंतरही शेतकरी पारतंत्र्यात आहे. शेतकऱ्यांच्या वाट्याला स्वातंत्र्य आलेच नाही असे प्रतिपादन किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब यांनी केले. ते परभणी तालुक्यातील दैठणा येथे झालेल्या जाहीर सभेत बोलत होते. व्यासपीठावर ऍड.मिलिंद यादव, ऍड अरविंद सोळंके कुपटेकर, ऍड.चोखट यांची उपस्थिती होती. सभेचे संचालन सुभाष कच्छवे यांनी केले.
या प्रसंगी अमर हबीब म्हणाले की, म. गांधी भारतात आल्यानंतर त्यांनी चंपारण्य येथे पहिले आंंदोलन शेतकऱ्यांसाठी केले. सरकारने नागरिकांवर बंधणे घालु नयेत. त्यांच्या स्वातंत्र्याचा संकोच करू नये असा पत्रव्यवहार ही नेहरूंना केला होता. शेतकरी आत्महत्या या १८जुन १९५१ च्या पहील्या घटनादुरुस्तीचा परिणाम आहे. शेतकरी हा रेल्वेचा डबा नसून इंजिन आहे. देश उभा करावयाचा असेल तर अगोदर शेतकरी उभा करावा लागेल. कमाल शेतजमीन धारणा कायदा, जमिन अधिग्रहण कायदा, आवश्यक वस्तु हे नरभक्षी कायदे रद्द झाल्याशिवाय शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळणार नाही. शेतकऱ्यांनी भरलेल्या करातूनच देश चालतो आहे असेही अमर हबीब म्हणाले. सभेचे प्रास्ताविक सुभाष कच्छवे यांनी केले. सभेस शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.
*19 मार्चला उपवास*
शेतकऱयांच्या आत्महत्या कमी होत नसून वाढत आहेत. याकडे लक्ष वेधत अमर हबीब यांनी आत्महत्या केलेल्या तमाम शेतकऱयांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी 19 मार्चला एक दिवस उपवास करावा असे आवाहन केले.
stay connected