*रविवारी कॉ.गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार वितरण*
अहमदनगर - *शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने देण्यात येणारा कॉ. गोविंदभाई पानसरे स्मृती प्रबोधन पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते ज्ञानदेव पांडुळे (मंत्री मामा) यांना रविवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजी दुपारी तीन वाजता कोहिनूर मंगल कार्यालय, अहमदनगर येथे प्रदान करण्यात येणार आहे*.
यावेळी अहमदनगर शहराचे आमदार संग्रामभैया जगताप, बीड येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या प्रा.सुशीलाताई मोराळे,सोलापूर येथील ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते प्रा.तानाजी ठोंबरे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व हमाल पंचायत चे राज्य उपाध्यक्ष कॉ.बाबा आरगडे इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष राजेंद्र उदागे,जिल्हाध्यक्ष राजेंद्र चोभे,शेवगाव तालुका अध्यक्ष हरिभाऊ नजन,नेवासा तालुका अध्यक्ष डॉ.किशोर धनवडे,राहुरीच्या कार्याध्यक्ष जयश्री झरेकर,कोपरगाव चे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.संजय दवंगे, आष्टी चे अध्यक्ष बाळासाहेब शेंदुरकर, पारनेरच्या स्वाती ठुबे, श्रीरामपूरच्या प्राचार्य डॉ. गुंफा कोकाटे, राज्य कार्यकारणी चे खजिनदार भगवान राऊत, प्रा. डॉ.अशोक कानडे,सुभाष सोनवणे, राजेंद्र फंड, बबनराव गिरी,राजेंद्र पवार व शर्मिला गोसावी यांनी केले आहे.
stay connected