महाराष्ट्र शासनच्या आरोग्य चित्रपट महोत्सवात 'तडा' लघुपटाला मानांकन प्राप्त
विशाल सिरसट व सचिन मोरे दिग्दर्शित नवोदित अभिनेता विजय जायभाये मुख्य भूमिकेत असलेल्या तडा व शेतकरी या लघुपटांना नुकताच सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनच्या 'महा आरोग्य फिल्म फेस्टिवल 2022-23 महोत्सवात मानांकन जाहीर झाले.
तडा या लघुपटाद्वारे एका वेगळ्या परंतु आपल्या आजूबाजूला घडणा-या विषयाची मांडणी केली आहे. हा लघुपट एका विशिष्ट विचारधारेला भेद देणारा आणि समाजाला दिशादर्शक ठरणारा आहे. याचीच दखल घेत या महोत्सवात मानांकन जाहीर झाले आहे.
तडा या लघुपटाद्वारे लेखक, कवी विजय जायभाये, मधुकर सुतार, पायल पालवे हे नवोदित कलाकार आपल्याला अभिनय क्षेत्रात पदार्पण करताना दिसतात. या नवोदितांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर विशाल सिरसट लिखित तडा या कथेला योग्य तो न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न केला आहे. त्याच बळावर अतिशय अल्पावधीत तडा हा लघुपट वेगवेगळ्या स्तरावर यश संपादन करताना पहायला मिळत आहे.त्यांचे संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक होत आहे. तडा या लघुपटाचे रंगभूषाकार व वेशभूषाकार कोमल नितीन शिखरे, संकलन , चित्रीकरण , छायांकन व संगीत सचिन मोरे, निर्माता विशाल नामदेव सिरसट तसेच द वैयक्तिक प्रोडक्शन निर्मिती पप्पू पानझाडे चित्रपट क्षेत्रात उत्तम कार्य करत आहेत.
stay connected