महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ येथे सर्वरोग निदान शिबीर
*लातूर प्रतिनिधी चंद्रकांत पाटील*
आरोग्य तपासणी संपन्न महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शेडोळ.ता.निलंगा जि.लातूर 🩺🩺🩺🩺🩺💊💊💉💉 --------------------- येथे आज17 फेब्रुवारी 2023 रोजी सर्व रोग तपासणी शिबिर संपन्न करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन विद्यालयाचे प्राचार्य श्री संजीव कदम सर यांच्या हस्ते संपन्न झाले,या शिबिरामध्ये जवळपास 20 वेगवेगळ्या आजाराची तपासणी करण्यात आली, इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या सर्व मुला-मुलींनी या शिबिरामध्ये आपल्या अडीअडचणी बोलून दाखवल्या डॉक्टर व त्यांच्या पथकांनी त्यांना योग्य मार्गदर्शन करून तात्काळ विविध औषधे दिली,या तपासणी शिबिरानंतर विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. या तपासणी शिबिराचे प्रमुख डॉ.योगेश पाटील साहेब व त्यांची सर्व टीम उपस्थित होती. व विद्यार्थ्यांशी बराच वेळ देऊन ते समाधानकार पणे चर्चा करून विद्यार्थ्यांचे समाधान करत होते......
stay connected