*आदर्शगाव सराटेवडगाव -आनंदवाडी येथे शालेय साहित्य वाटप*************************आ.सुरेश धस यांंच्या वाढदिवसानिमित्त समाजपयोगी उपक्रम राबविले- उत्तमराव बोडखे**आ.सुरेश आण्णा धस यांंच्या आदेशाने समर्थकांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्य केले- प्रविण पोकळे*
************************
************************
आष्टी (प्रतिनिधी)
सामाजिक कार्याकर्ते,राजकीय नेत्यांचे वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरे होतात.मात्र आ.सुरेश धस यांनी यावर्षी समाजपयोगी उपक्रमाने आपला वाढदिवस साजरा करावा असे कार्यकर्त्यांना आवाहन केलेले होते. या आवाहनानंतर त्यांना हजारो पुस्तके (बुके) दिले गेली.मला बुके हार तुरे नको तर बुके द्या अशी भावना व्यक्त केली. वाढदिवसानिमित्त मतदार संघातदेखील विविध उपक्रम ,कार्यक्रम ,स्तुत्य उपक्रम घेऊन साजरा केला.विद्यार्थ्यांंना शालेय साहित्य वाटप केल्याने नक्कीच नवीन पिढीला ते उपयोगी पडतात.आ.सुरेश धस यांंच्या वाढदिवसानिमित्त समाजपयोगी उपक्रम राबविले असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार उत्तमराव बोडखे यांनी केले.
आष्टी तालुक्यातील आदर्शगाव सराटेवडगाव -आनंदवाडी येथील जि.प.
प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांंना लोकनेते आ.सुरेश धस यांच्या वाढदिवसानिमित्त आदर्शगाव सराटेवडगांव - आनंदवाडी येथील आ.सुरेश धस मित्र मंडळाच्यावतीने शैक्षणिक साहित्य,वह्या व पुस्तके वाटप करण्यात आले.
यावेळी ते प्रमुख पाहुणे या पदावरुन बोलत होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार प्रविण पोकळे हे होते.
आ.सुरेश धस यांनी समाजपयोगी उपक्रमाने वाढदिवस साजरा करण्याचे मतदार संघात आवाहन केल्यानंतर आदर्शगाव आनंदवाडी - सराटेवडगाव येथे शैक्षणिक शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार प्रविण पोकळे व मान्यवराच्या हस्ते शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पत्रकार प्रविण पोकळे म्हणाले की,आण्णा हे आपल्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब विद्यार्थ्यांंना कशी मदत होईल,रक्तदान शिबीरातुन कसे अनेकांना जीवदान मिळेल याचाच विचार करतात.यावर्षी शालेय विद्यार्थ्यांंना शालेय साहित्य,
गणवेश,वह्या पुस्तके,पेन,कंपास वाटप करा असे सांगत होते.हे काम सराटेवडगांव - आनंदवाडी येथील आण्णांचे कट्टर समर्थकांनी केले. सराटेवडगांवकरांचे आण्णाच्यावतीने मी अभिनंदन करतो असे सांगीतले.आ.सुरेश आण्णा धस यांंच्या आदेशाने समर्थकांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्य केले असे प्रतिपादन पत्रकार प्रविण पोकळे यांनी केले.
यावेळी माजी उपसरपंच महादेव शिंदे,
सेवानिवृत्त पीएसआय शेख अन्सारभाई,
चेअरमन बबन नन्नवरे यांची भाषणे झाली.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,पत्रकार प्रविण पोकळे,गणप्रमुख चेअरमन युनुस शेख,माजी उपसरपंच महादेव शिंदे,अशोक तरटे,केंद्रप्रमुख तथा मुख्याध्यापक सिद्धेश्वर शेंडगे,सेवानिवृत्त पीएसआय शेख अन्सारभाई, सेवा सह.संस्थेचे माजी चेअरमन राजाराम नन्नवरे, चेअरमन बबन नन्नवरे,माजी पं.स.भानुदास बोडखे,ग्रा.पं.सदस्य अशोक तरटे,बबन पाटील सुंबरे,शरीफखाॕन पठाण,
माजी ग्रा.पं.सदस्य रंगनाथ बोडखे,संपत सुंबरे,ग्रा.पं.सदस्य बापूराव सुंबरे,श्रीरंग मिसाळ, ग्रा.पं.सदस्य राजू भाई शेख,विनोद तरटे,रमेश सुंबरे,भाऊसाहेब शेळके,आदिसह शाळेतील सर्व शिक्षक,कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार शाळेचे मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख सिद्धेश्वर शेंडगे यांनी केले.
stay connected