माननीय पंतप्रधान यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ केला.
महाराष्ट्र राज्यातील शिर्डी, नाशिक, पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट या महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना ‘वंदे भारत ट्रेन’ कनेक्शन मिळाले आहे.
श्री नरेंद्र मोदी, माननीय पंतप्रधान यांनी आज दि. 10.2.2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशन मुंबई येथून दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. श्री एकनाथ शिंदे, माननीय मुख्यमंत्री, महाराष्ट्र; श्री अश्विनी वैष्णव, माननीय केंद्रीय रेल्वे, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री; श्री नारायण राणे, माननीय केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री; श्री रामदास आठवले, माननीय केंद्रीय सामाजिक सक्षमीकरण राज्यमंत्री; श्री कपिल पाटील, माननीय केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री; श्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र, श्री राहुल नार्वेकर, माननीय अध्यक्ष, महाराष्ट्र विधानसभा,; श्री दीपक केसरकर, माननीय मंत्री शालेय शिक्षण आणि मराठी भाषा, महाराष्ट्र सरकार; श्री रवींद्र चव्हाण, सार्वजनिक बांधकाम, अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री, महाराष्ट्र सरकार यावेळी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना संबोधित करताना श्री नरेंद्र मोदी म्हणाले की, वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनने आतापर्यंत भारतातील 108 जिल्ह्यांना जोडले आहे. श्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, महाराष्ट्राला यापूर्वी सरासरी दरवर्षी मिळणाऱ्या अंदाजपत्रकाच्या 12 पट तरतूद करण्यात आली आहे. श्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रासाठी 2 वंदे भारत एक्सप्रेस गाड्या दिल्याबद्दल पंतप्रधानांचे आभार मानले. श्री देवेंद्र फडणवीस, जीआयपी रेल्वेचे संस्थापक संचालक श्री नाना शंकर शेट यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण केले.
श्री अनिल कुमार लाहोटी अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, रेल्वे बोर्ड; श्री नरेश लालवानी, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे; श्री अशोक कुमार मिश्र, महाव्यवस्थापक, पश्चिम रेल्वे आणि मध्य व पश्चिम रेल्वेच्या विभागांचे प्रमुख, इतर वरिष्ठ रेल्वे अधिकारी आणि निमंत्रित याप्रसंगी उपस्थित होते.. इतर मान्यवर आणि निमंत्रितांसह शाळकरी मुले, रेल्वे चाहते, YouTubers आणि इतर रेल्वे प्रेमी देखील या प्रसंगी उपस्थित होते.
महाराष्ट्रातील विविध शाळांमधील सुमारे 32,000 विद्यार्थ्यांनी #वंदेभारत या थीमवर चित्रकला, लेखन आणि भाषण स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. या स्पर्धांमधील विजेत्यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून #वंदेभारत एक्सप्रेस ट्रेनने प्रवास केला.
1) मुंबई-सोलापूर वंदे भारत ट्रेन
ही देशातील ९वी वंदे भारत ट्रेन असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि सोलापूर दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवेल. व्यापारी राजधानी असलेल्या मुंबईला जागतिक दर्जाच्या नवीन ट्रेनने महाराष्ट्रातील कापड आणि हुतात्मा शहराशी जोडले जाईल. यामुळे सोलापूरमधील सिद्धेश्वर, अक्कलकोट, तुळजापूर, सोलापूरजवळील पंढरपूर आणि पुण्याजवळील आळंदी ही तीर्थक्षेत्रेही जलदगतीने जोडली जातील.
वंदे भारत एक्स्प्रेस गाडी जी सोलापूरहून गुरुवार वगळता दररोज सकाळी 6.05 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 12.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. परतीच्या प्रवासात, वंदे भारत ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून बुधवार वगळता दररोज सायंकाळी 4.05 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.40 वाजता सोलापूरला पोहोचेल. ती दादर, कल्याण, पुणे आणि कुर्डुवाडी येथे थांबेल.
मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन 6 तास 30 मिनिटांत 455 किमी अंतर पर करेल तर सध्याच्या सुपरफास्ट ट्रेनला 7 तास 55 मिनिटे लागतात त्यामुळे प्रवासाचा 1 तास 30 मिनिटांचा वेळ वाचतो. आपल्या वाटेवर ही गाडी एकाच दिवशी भोर घाटावर चढेल आणि उतरेल, म्हणजे लोणावळा-खंडाळा घाट विभागात, ज्याचा सर्वात उंच उतार 37 मीटरवर 1 मीटर आहे.
2) मुंबई - साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेन
ही देशातील १०वी वंदे भारत ट्रेन असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि साईनगर शिर्डी दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवेल. नाशिक, त्र्यंबकेश्वर, साईनगर शिर्डी, शनि शिंगणापूर या महाराष्ट्रातील तीर्थक्षेत्रांशी व्यापारी राजधानी जोडली जाईल.
मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन मंगळवार वगळता दररोज सकाळी 6.20 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि साईनगर शिर्डी येथे सकाळी 11.40 वाजता पोहोचेल. परतीच्या प्रवासात साईनगर शिर्डी येथून मंगळवार वगळता दररोज सायंकाळी 5.25 वाजता सुटून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रात्री 10.50 वाजता पोहोचेल. ती दादर, ठाणे आणि नाशिकरोड येथे थांबेल.
मुंबई – साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन ५ तास २० मिनिटांत ३४३ किमी अंतर कापेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सध्या थेट ट्रेन नाही. आपल्या वाटेवर ही गाडी एकाच दिवशी थुल घाटावर चढेल आणि उतरेल. म्हणजे कसारा-इगतपुरी घाट विभागात, ज्याचा सर्वात उंच उतार 37 मीटरवर 1 मीटर आहे.
------- ------ ------
stay connected