*आजच्या पत्रकार आंदोलनाचे फलित*.. ---------------------------------------------- *आंबेरकरची पोलीस कोठडीत रवानगी, :पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हाही दाखल*

 *आजच्या पत्रकार आंदोलनाचे फलित*.. 
----------------------------------------------
*आंबेरकरची पोलीस कोठडीत रवानगी, :पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हाही दाखल* 



मुंबई : मराठी पत्रकार परिषद आणि अन्य संघटनांच्या आजच्या राज्यव्यापी आंदोलनाचा धसका रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने घेतला.. रत्नागिरीत दोन घटना घडल्या.. पत्रकार शशिकांत वारिशे यांचा मारेकरी पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात आज पत्रकार हल्ला विरोधी कायद्याच्या कलम ४ अन्वये गुन्हा दाखल केला गेला.. याची चौकशी डीवायएसपी सदाशिव वाघमारे यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.. ही आपली मागणी होती ती मंजूर केली गेली..



दुसरी महत्वाची घटना.. पंढरीनाथ आंबेरकर याला अटक होताच त्याच्या छातीत कळ येऊ लागली.. त्यामुळे त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आले.. तेथे त्याची बडदास्त ठेवली गेली.. याला पत्रकारांनी आक्षेप घेतला.. त्यावर त्याचा रक्तदाब वाढल्याचे सांगण्यात आले.. मात्र विविध तपासण्या केल्यानंतर हा लबाड लांडगा ढोंग करतोय हे वास्तव समोर आले.. त्यातच पत्रकारांच्या आंदोलनाने दबाव वाढला होता.. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांचाही नाईलाज झाला आणि त्यांनी आंबेरकर याला रूग्णालयातून डिस्चार्ज दिला .. त्याची रवानगी आता पोलीस कोठडीत केली गेली आहे..

आजच्या पत्रकार आंदोलनाचं फलित म्हणजे आपल्या दोन्ही मागण्या मान्य झाल्या आहेत.. शशिकांतच्या कुटुंबीयांना पूर्ण न्याय मिळेपर्यंत याचा पाठपुरावा करण्यात येईल असे एस.एम देशमुख यांनी स्पष्ट केले आहे...



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.