*इनर व्हिल ऑफ संगमनेर तर्फे सुप्रिया इंगळे यांना राष्ट्रबांधनीचे शिल्पकार पुरस्कार प्रदान*
नेवासा- इनर व्हिल ऑफ संगमनेर यांच्या तर्फे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना राष्ट्र बांधनीचे शिल्पकार या पुरस्काराने गौरविण्यात आले. जि. प प्राथ शाळा गंगानगर येथील सुप्रिया इंगळे यांची नेवासा तालुक्यातुन निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला मा डाॅ बी जी शेखर पाटील , IPS विशेष पोलीस महानिरीक्षक , नाशिक व मा सुधीर तांबे साहेब ,तसेच नगराध्यक्षा मा दुर्गा ताई तांबे, इनरव्हिलच्या व्हा. चेअरमन रचना मालपाणी, मा ज्ञानेश्वर काजळे, गणेश काजळे, गटशिक्षणाधिकारी सुवर्णाताई फटांगरे गटविकास अधिकारी अनिल नागणे उपस्थित होते .इनरव्हिल च्या अध्यक्षा मा वृषालीताई कडलक यांनी सर्व पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्याची दखल घेऊन राष्ट्रबांधनीचे शिल्पकार या पुरस्काराने सर्व शिक्षकांना गौरविण्यात आले.
stay connected