ज्येष्ठ नागरिकांना मिळाली विविध उपक्रमांची मेजवानी!!!!!!!!!!!!
पुणे: आम्रपाली धेंडे - : भारतीय जनता पार्टी तर्फे पुण्यात आयोजित
केलेल्या विविध उपक्रमांचा ज्येष्ठ नागरिकांनी मनसोक्त आनंद घेतला.
राष्ट्रीय पदाधिकारी डॉ मेधा कुलकर्णी यांच्या विशेष उपस्थितीत महिला मेळावा
घेण्यात आला. पैठणीचा खेळ घेण्यात आला. स्व.अटलबिहारी वाजपेयी यांच्या
जयंती निमित्त विश्व विख्यात कवी डॉ .मधुसूदन घाणेकर
यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे काव्य.संमेलन घेण्यात आले.माजी आमदार कवी विश्वास गांगुर्डे आणि सहकारी यांनी रंग अटल मनाचे हा
कार्यक्रम केला. या विशेष कार्यक्रमास
भाजप राज्य उपाध्यक्ष माधव भंडारी
उपस्थित होते. शहर अध्यक्ष मदन डांगी यानी प्रास्ताविक केले. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले .
राज्य सचिव धीरज घाटे
प्रमुख अतिथी होते.आत्मनिर्भर भारत
या घोषवाक्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ज्येष्ठ नागरिक आघाडीचे
शहर अध्यक्ष मदन डांगी यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ साहित्यिक मंदा नाईक यांच्या शुभहस्ते झाला. सांस्कृतिक
विभागाचे शहर अध्यक्ष आणि पाहिल्या विश्व साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.मधुसूदन घाणेकर यांनी मार्गदर्शनपर भाषण केले.सरचिटणीस सारिका सासवडे यांनी सूत्रसंचालन केले. विलास दातार यांनी स्वागत गीत सादर केले.
उपाध्यक्ष प्रिया दामले यांनी अतिथी स्वागत केले. शशिकांत ढोणे यांनी
संयोजन केले. श्रीनिवास तेलंग, श्रीकांत कुलकर्णी, तुळशीराम उणेचा, अंजली भागवत, प्रदीप मोरे, त्र्यंबक बोरीकर,
स्वाती दिवाण, आदी शहर पदाधिकाऱ्यांनी हे सर्व उपक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष सहकार्य केले.
आम्रपाली धेंडे,गीतांजली सटाणेकर, राजश्री वाणी ,रविंद्र गाडगीळ, शलाका गाडगीळ,चंद्रशेखर धर्माधिकारी नागेश हुलावळे, त्र्यंबक बोरीकर आदि घोषवाक्य स्पर्धेचे विजेते ठरले.
stay connected