*बोगस दिव्यांग प्रमाणपत्र अपात्र व्यक्तींना निर्गमित करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर व प्रमाणपत्र धारण करणाऱ्या सर्व अधिकारी शिक्षक कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करा*
माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष आम आदमी पार्टी.
__________________________
बीड आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यामार्फत पत्र जिल्ह्यामध्ये अनेक लोकांनी दिव्यांग प्रमाणपत्र अवैध पद्धतीने पात्रता नसताना देखील अपात्र व्यक्तींना निर्गमित केल्याचे व सदरील प्रमाणपत्र धारकांनी ते प्रमाणपत्र विविध कार्यालयात नोकरी मिळवण्यासाठी दाखल केल्याचे निष्पन्न झाले आहे सदरील प्रमाणपत्राची व सदरील व्यक्तींची पुन्हा तपासणी बीड जिल्हा परिषदेमार्फत नियमाप्रमाणे करण्यात आली असून त्यामध्ये अनेक बोगस प्रमाणपत्र धारक असतील असल्याचे चौकशी मध्ये निष्पन्न झाले आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड यांनी कार्यालयाकडून निर्गमित केलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र धारक कर्मचाऱ्यांना शिक्षकांना रीतसर चौकशी करून त्यांचे अपंग अपंगत्व व त्यांच्या प्रमाणपत्रावर नोंद असलेले अपंगतत्वाचे प्रमाण यामध्ये तफावत आढळल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई देखील केलेली आहे
दिव्यांग प्रमाणपत्र आपल्या कार्यालयाकडून निर्गमित केलेले आहेत सदरील बोगस प्रमाणपत्र आपल्या कार्यालयाची दिशाभूल करून तसेच फसवणूक करून निर्णय निर्गमित केलेले आहेत काय तसेच ते आपल्या कार्यालयाने निगमित केलेले असतील नसतील याची सखोल चौकशी होऊन सदरील बोगस प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या डॉक्टर व अधिकारी यांच्यावर तसेच सदरील बोगस प्रमाणपत्र धारण करणाऱ्या सदरील प्रमाणपत्राचा वापर विविध शासकीय कार्यालयात करणाऱ्या कर्मचारी अधिकारी शिक्षक यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई होणे आवश्यक आहे असे निवेदन प्रति कॉपी म्हणून
पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक कार्यालय, बीड
जिल्हा अधिकारी,जिल्हा अधिकारी कार्यालय बीड जिल्हा समाज कल्याण अधिकारी, समाज कल्याण विभाग बीड या सर्व भागांना सुचित करण्यात आले आहे यावर कारवाई झाली नाही तर आम आदमी पार्टी आंदोलन करणार निवेदन देतेवेळी माजी सैनिक अशोक येडे जिल्हाध्यक्ष सचिव रामधन जमले शहराध्यक्ष सय्यद सादेक रामभाऊ शेरकर माजी सैनिक प्राध्यापक संजय खाडे तालुकाध्यक्ष भीमराव कुटे युवा नेते प्रवीण पवार सर्कल प्रमुख दत्ता सुरवसे इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते
stay connected