गुणवंत विद्यार्थी आणि आदर्श नागरिक जरेवाडी सारख्या शाळाच घडवू शकतात... सुरेश पाटोळे
अंमळनेर/ प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील अंमळनेर गटाच्या दौऱ्यावर असलेले शिव संघर्ष ग्रुप चे संघर्षशिल नेते सुरेश पाटोळे यांनी याच गटातील जिल्हा परिषद आदर्श शाळा जरेवाडीला भेट देवून विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे तोंडभरून कौतुक केले.
यावेळी शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधतांना पत्रकार सुरेश पाटोळे म्हणाले की, आदर्श शाळाच गुणवंत विद्यार्थी घडवू शकते या शाळेतील शिक्षक अत्यंत गुणी आहेत. त्यांच्याजवळ सचोटी, चिकाटी आणि कसोटी या तीन गुणांचा त्रिवेणी संगम झालेला दिसतो. शाळेचा दर्जा शिक्षकांच्या गुणांवर अवलंबून असतो. कारण गुणवंत शिक्षक विद्यार्थ्यांची प्रतिमा फुलवण्याच्या दृष्टीने प्रेरणादायी ठरतात. विद्यार्थ्यांच्या गुणाची कदर करून त्यांच्या पाठीवर थाप मारून रंजनातून, उद्बोधनातून धीर देण्याचे व मार्गदर्शनाचे काम ते सातत्याने करत असतात. विद्यार्थ्यांच्या मनात आशावादी किरणे देणारे ते एक प्रकारे संस्काराचे दीप ठरत असतात. विद्यार्थ्यांमध्ये दडलेल्या विचारांना, त्यांच्या सुप्त गुणांना व सुप्त शक्तींना हळुवारपणे जागे करण्याचे काम या शाळेतील शिक्षक करतांना दिसतात. त्यांच्यातील दुर्गुण काढून सद्गुणाची मूर्ती त्यामुळे आपोआप तयार होत असते आणि असेच विद्यार्थी पुढे समाजाचे आदर्श ठरत असतात असे आदर्श विद्यार्थी घडवण्याचे काम या शाळेतील शिक्षक करतात. खरोखरच ही शाळा आदर्श आहे. शाळेतील शिक्षकही आदर्श आहेत आणि त्यांच्याकडून होणाऱ्या आदर्श कार्यामुळे आदर्श आदर्श विद्यार्थी घडवले जातात हे सर्वश्रुत आहे त्यामुळे "लळा लावुनी मुला... शिकविते शाळा" हे वचन सार्थ ठरते. जरेवाडी सारख्या आदर्श शाळा तयार होण्याची आवश्यता आहे, त्याशिवाय आदर्श व गुणवंत समाज निर्माण होणार नाही. आज माणुसकी संपत चालली असून चांगले नागरिक होण्याची गरज आहे. तरच देश महासत्ता होण्यास मदत होईल. काही मोजक्याच शाळा आहेत की, शिक्षकांच्या परिश्रमामुळे त्यांना सर्वोच्च पुरस्कार आयएसओ (ISO) मानांकन मिळालेले आहे. त्यापैकी ही शाळा असून एक शिक्षण क्षेत्रातील आदर्श मॉडेल आहे. सुरेश पाटोळे यांनी विद्यार्थी, सर्व शिक्षक यांचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी मुख्याध्यापक संदीप पवार यांनी सुरेश पाटोळे यांचे स्वागत करुन सहृदय सत्कार केला.यावेली श्री आजिनाथ सुळे, श्री मल्हारी शिंदे, श्री युवराज पवार, श्री विनोद आमले, श्री उद्धव पवार, श्री राजेश पवार, श्री राहुल डोंगर, श्री नारायण नरसाळे ,श्री गजानन बेद्रे, श्री सूर्यकांत ढवळे, श्री कैलास पवार, श्री भगवान जाधव, इत्यादी आदर्श शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
stay connected