सर्वात मोठी बातमी : शिंदे गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह ! केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश, ठाकरे गटाला मोठा धक्का
नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. आताच मिळालेल्या माहिती नुसार , मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचा आदेश दिले असून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का आहे
केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच याबाबत निकाल जाहीर केला असून, या निकालात केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेचं नाव आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळेल, असं स्पष्ट लिहिलं आहे.
stay connected