*जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ढाकेफळ येथे दंत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न*

 *जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ढाकेफळ येथे दंत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न*




==========================

केज (प्रतिनिधी)

केज: आज दिनांक ७ जानेवारी २०२३,शनिवार रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ढाकेफळ शाळेत राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांची मौखिक तपासणी व कीड प्रतिबंध शिबिर आयोजित करण्यात आले.

 जिल्हा उप रुग्णालय केज येथील दंत चिकित्सक डॉ. श्री रमण दळवी यांनी विद्यार्थ्यांना मौखिक आरोग्य याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

 दाताची घ्यावयाची काळजी, दाताची कीड रोखण्यासाठी करावयाचे उपाय याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले .

इयत्ता पहिली ते इयत्ता सातवी च्या दीडशे विद्यार्थ्यांची मौखिक तपासणी करून त्यांना योग्य ते वैयक्तिक मार्गदर्शनही केले. यावेळी आरोग्य समुपदेशक गिरी मॅडम यांनी विद्यार्थ्यांशी आरोग्य आणि आहाराबाबत सखोल चर्चा व मार्गदर्शन केले.

डॉ. श्री रमण दळवी यांचे स्वागत मुख्याध्यापक श्री अंधारे सर यांनी केले .

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री तरकसबंद सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. चाटे सर, श्रीम. मोराळे मॅडम, श्रीम. कदम मॅडम, श्रीम. नेहरकर मॅडम, श्रीम. साखरे मॅडम यांनी सहकार्य केले



.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.