शिरापूर येथील विजय आनंदराव कापरे या युवकास बेदम मारहाण

 शिरापूर येथील विजय आनंदराव कापरे या युवकास बेदम मारहाण.







कडा/अनिल मोरे.


आष्टी तालुक्यातील शिरापुर येथील युवकास बेदम मारहाण झाल्याची घटना शुक्रवारी 30 /12/2022 रोजी घडली .

याबाबत अंभोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . फिर्यादीने तक्रारीत म्हटले आहे की - विजय आंनदराव कापरे हा युवक कडा येथे काही कामानिमित्त आला होता व ते काम उरकुन शिरापुरकडे  आपल्या गांवी परत गेला शिरापुर बस स्टॅन्ड वर उतरला असता विजय कापरे गांवामध्ये काही कामानिमित्त थांबला आसता बाबासाहेब किसन देवकर हे गांवात आले असता त्यांनी विजय कापरे याला म्हणाले आता भागले का  विजय कापरे म्हणाले काय झाले. बाबासाहेब किसन देवकर म्हणाले तुझे बर्याच वेळेस झाले .तुझ्याकडे एकदिवस बघावे लागेल आम्ही जिव मारून टाकु बाबासाहेब किसन देवकर महणाले की तु आमच्या पॅनल मध्ये का नाही आला.

(CCTV Footage )



आमचा उपसरपंच करायचा होता.तु आमच्याकडे आला नाही आम्हीतुझे हातपाय मोडुन टाकु नाहीतर तुला जिंवत मारुन टाकु.

बाबासाहेब किसन देवकर यांनी आपला मुलगा विशाल बाबासाहेब देवकर यांना फोन केला असता तु गांवामध्ये  ये . येताना दोन चार दांडके घेउन ये  व विशाल बाबासाहेब देवकर हा युवक गाडीवरुन गावामध्ये आला असता तो गाडीवरुन खाली उतरला तोच दांडक्याने मारहान करायला सुरुवात केली विजय कापरे या युवकास  बाबासाहेब किसन देवकर व मुलगा विशाल बाबासाहेब देवकर यांनी  विजय कापरे या युवकास बेदम मारहाण केली यामध्ये त्याचा डावा हात  मोडला आहे.

विजय आंनदराव कापरे यांनी अंभोरा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद केला असून पुढील प्रमाणे कलम लावण्यात आले आहे.

कलम(326)(324)(323,)(504)(506)(37) कलम नुसार गुन्हा दाखल करूनही आठ दिवस लोटले असुन आरोपी मोकाट असुन पोलीस प्रशासन कसल्याही प्रकारची दखल घेत नाही .

तरी आरोपीला लवरात लवकर आटक करुन मला न्याय द्यावा असे विजय आंनदराव कापरे यांनी तेजवार्ताशी बोलताना सांगितले.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.