आज मुख्यमंत्री शिंदे -उपमुख्यमंत्री फडणवीस गहिनीनाथगडावर संत वामनभाऊंच्या पुण्यतिथी सोहळ्याला उपस्थिती राहणार...
धामणगाव:दादा पवळ- पाटोदा तालुक्यातील श्री क्षेत्र गहिनीनाथ गडाचे श्री संत वैकुंठवासी वामनभाऊ महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा दि . १५ जानेवारी रोजी तालुक्यातील गहिनीनाथगडावर येथे संपन्न होत आहे. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आयोजीत कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
गहिनीनाथगडावर येथे पहिल्यांदाच मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री एकत्र येत असल्याने या कार्यक्रमाला त्यांचे विचार ऐकण्यासाठी मोठी गर्दी होणार आहे. श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथीच्या सोहळ्याचे आयोजन गहिनीनाथगडावर १५ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.
stay connected