जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठाणचे यशवंत रत्न राज्यस्तरीय पुरस्कार समीर शेख यांना जाहीर
आष्टी : नेहमी सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या, जय मल्हार सामाजिक प्रतिष्ठान बीड यांच्या माध्यमातून दरवर्षी राजे यशवंतराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त दिल्या जाणाऱ्या पुरस्काराची घोषणा नुकतीच बीड येथे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर यांनी केली आहे.
त्यामध्ये आष्टी तालुक्यातील सांगवी पाटण येथील सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे, त्यासोबत दांडगा राजकीय संपर्क असलेले, व पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरिबांचा आवाज न्यायव्यवस्थेपर्यंत पोहोचत सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणारे , सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार. समीर शेख यांना यावर्षीचा यशवंतरत्न हा राज्यस्तरीय पुरस्कार, राजे यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेकदिनी जाहीर झाला आहे.
समीर शेख हा युवक उच्चशिक्षित असून त्यांचे शिक्षण M.sc B.ed झाले आहे. तो सध्या आ.सुरेश (आण्णा) धस यांचे स्वियसहायक म्हणून काम पहात आहे. तसेच पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडत, न्यायला देतं आहे. समाजात सामाजिक एकोपा राहावा. यासाठी समाजात सर्व धर्म समभावाची बीजे खोलवत रुजवत आहे. हा मुस्लिम तरुण कुठलाही धार्मिक भेदभाव वैचारिक मत भिन्नता न बाळगत गेल्या दहा वर्षापासून शिवनेरी ते सांगवी पाटण पायी ज्योत घेऊन येत आहे. तसेच , सहा वर्षांपासून उत्तर प्रदेश (काशी) ते सांगवी पाटण गंगाजल आणत आहे. त्यासोबत समाजात माणुसकी जिवंत ठेवण्यासाठी कृतीतून संदेश देतं, नेहमी अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करत, माणुसकी जपायचं काम तो करत असतो.
समीर याचे सामाजिक काम उल्लेखनीय आहे. तो नेहमी सर्वसामान्य गोरगरीब गरजूंना सदैव मदत करण्यासाठी धावून जातं निस्वार्थपणे मदतीचा हात देत असतो. तसेच निसर्गप्रेमी असून, मुक्या प्राण्यावरती दया करणे हा त्याचा छंद व मूळ स्वभाव आहे. त्यासोबत ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या अडीअडचणीला धावून जाणे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामात मदत करणे, तालुकास्तरावरती पंचायत समिती, तहसील कार्यालय खरेदी विक्री कार्यालय, न्यायालय, पोलीस स्टेशन, आधी ठिकाणचे सर्वसामान्य नागरिक, शेतकऱ्यांची कामे मागील मार्गी लावण्यासाठी अहोरात्र सतत झटत असतो. याच कामाची पोचपावती म्हणून या संस्थेकडून हा मानाचा सन्मान प्रदान करण्यात येत आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विविध क्षेत्रातून समीर शेख यांच्यावर अभिनंदन व कौतुकाचा वर्षाव होत आहे.
stay connected