माधुरी काकडे यांना"सृष्टीकाव्य" या संपूर्ण पर्यावरणावरील आधारित काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
आम्रपाली धेंडे
संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच मांजरी, हडपसर यांच्या संयुक्त वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा प्रथम क्रमांकाचा
संत गाडगे महाराज उत्कृष्ट काव्यलेखन पुरस्कार दौंड येथील कवयित्री माधुरी काकडे यांच्या संपूर्ण पर्यावरणावर आधारित असलेल्या सृष्टीकाव्य या काव्यसंग्रहास जाहीर झाला असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष रणजीत पवार यांनी नुकतीच दिली.
या काव्यसंग्रहास याआधी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात उत्कृष्ट साहित्य सेवा सन्मान पुरस्कार मिळाला आहे.
यावेळी सन्मानचिन्ह, मानपत्र , शाल , श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २५ डिसेंबर २०२२ रोजी पुण्यात शिक्षक भवन,गांजवे पेठ, स्वारगेट येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे.
संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच मांजरी, हडपसर यांच्या वतीने सन या दोन वर्षांमध्ये प्रकाशित झालेल्या विविध प्रकारांतील उत्कृष्ट साहित्यकृतींस राज्यस्तरीय उत्कृष्ट वांड़मय पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले. या पुरस्कारासाठी महाराष्ट्राच्या अनेक भागांतून प्रवेशिका आल्या होत्या.
माधुरी काकडे यांचा संपूर्ण पर्यावरणावर आधारित 'सृष्टीकाव्य' हा काव्यसंग्रह असून यात अष्टाक्षरी, गीत, बालकविता, गझलसदृश्य, श्लोक सदृश्य, गवळण, सवाल-जवाब सारख्या विविध पारंपारिक प्रकारांचा समावेश आहे.
त्यांच्या काव्यसंग्रहास राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल परिसरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
stay connected