समाजाला दिशा देणारे शब्दगंध चे उपक्रम : किशोर डोंगरे
अहमदनगर - *सातत्याने समाजाला दिशादर्शक ठरणारे उपक्रम शब्दगंध राबवित असल्याने साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे, त्यामुळेच अनेक नवोदित साहित्यिक शब्दगंध मध्ये कार्यरत होत आहेत* असे मत सार्वजनिक बांधकाम अहमदनगर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी किशोर डोंगरे यांनी व्यक्त केले.
शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने कोहिनूर मंगल कार्यालयात अध्यक्ष राजेंद्र उदागे यांच्या अध्यक्षतेखाली दिनदर्शिका प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणुन ते बोलत होते.यावेळी ज्येष्ठ साहित्यिक ज्ञानदेव पांडुळे, व्ही.आर. डी. ई. चे सेवानिवृत्त अधिकारी अजयकुमार पवार, प्रा.डॉ. तुकाराम गोंदकर, शब्दगंध चे संस्थापक सुनील गोसावी, खजिनदार भगवान राऊत,शिवाजी गाडेकर, दयानंद आगलावे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलताना श्री. किशोर डोंगरे म्हणाले की,शब्दगंध च्या विविध उपक्रमाची माहिती या माध्यमातून सर्वांना मिळणार असून 300 च्या वर असणाऱ्या सर्व सभासदांना प्रेरणादायी अशी दिनदर्शिका मिळणार आहे.
अध्यक्षपदावरून बोलताना श्री. राजेंद्र उदागे म्हणाले की,लवकरच शब्दगंध चे साहित्य संमेलन आयोजित करून जास्तीत जास्त नवोदितांना संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या संमेलनातून केला जाईल,यासाठी सर्वांचे सहकार्य लागणार आहे.
यावेळी ज्ञानदेव पांडुळे, शिवाजी गाडेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शब्दगंध चे सहसचिव प्रा. डॉ. तुकाराम गोंदकर यांनी केले. कवयित्री शर्मिला गोसावी यांनी सूत्रसंचालन केले. तर भगवान राऊत यांनी आभार मानले. यावेळी बबनराव गिरी प्रा.डॉ. अशोक कानडे, राजेंद्र पवार, राजेंद्र फंड, हरिभाऊ नजन, बाळासाहेब अमृते यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते


stay connected