शिराळ ग्रामपंचायतीत आजबे विरुद्ध आजबे.. संजय आजबे यांनी उभे केले आव्हान. ************************************ विद्यमान आमदार आजबे यांच्या गावची ग्रामपंचायत निवडणूक होणार चुरशीची...

 





शिराळ ग्रामपंचायतीत आजबे विरुद्ध आजबे..
संजय आजबे यांनी उभे केले आव्हान.
************************************
विद्यमान आमदार आजबे यांच्या गावची ग्रामपंचायत निवडणूक होणार चुरशीची...

*******************************


*******************************

आष्टी (प्रतिनिधी)

 तालुक्यातील १०९  ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले असुन विद्यमान आ.बाळासाहेब आजबे यांच्या शिराळ गावातील लढत लक्षवेधी असणार आहे.कारण या ठिकाणी आ.सुरेश धस यांचा पॅनल असल्याने तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष संजय आजबे यांचे हे गाव असल्याने ग्रामपंचायतीची ही निवडणूक जोरदार चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.जय हनुमान परिवर्तन विकास पॅनलचे सरपंच पदाचे उमेदवार सचिन छत्रगुण आजबे व ११ सदस्य पदासाठी उभे असून यांच्या  निवडणूक प्रचाराचा प्रचार जेष्ठ कार्यकर्ते गंगाधर आजबे यांच्या हस्ते शुभारंभ गावातील ग्रामदैवतांना नारळ वाढवून शनिवारी दि.१० डिसेंबर रोजी सकाळी ९ वा.झाला.या प्रचार शुभारंभास ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला असून यावेळी गावाच्या समस्या आणि यावर कायमच्या उपाययोजना राबविण्यासाठी कटिबध्द असल्याचे यावेळी प्रचार शुभारंभ प्रसंगी गंगाधर आजबे बोलत होते.

पुढे बोलताना ते म्हणाले की,गावच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

गावातील सर्व धर्माच्या मंदीरासाठी निधी पुरवणे, शेतकरी, महिला बचत गट,अपंग, गावातील पाण्याची सोय,गटार कामे,लाईटची व्यवस्था,रस्त्याची सोय करणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.विरोधकावर टीका करण्यापेक्षा गाव विकास करण्याचे आमचे ध्येय असून मतदारांनी खोट्या माणसाच्या मागे उभा न राहता आमच्या पॅनलच्या उमेदवारांना साथ द्या उर्वरित प्रश्न सोडवू असे आश्वासन यावेळी गंगाधर आजबे यांनी दिले.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.