वंजारवाडी ग्रामपंचायतसाठी झाले ८५.६४ % मतदान !
धामणगाव, दि. (दादा पवळ):- आष्टी तालुक्यातील अत्यंत अवघड आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी ग्रामपंचायत म्हणून वंजारवाडी ग्रामपंचायत कडे पाहिले जाते आज वंजारवाडी ग्रामपंचायतच्या एकूण 3 वार्ड मधून ७ सदस्य आणि १ सरपंच अशा एकूण ८ जागेसाठी मतदान खेळीमेळीत शांततेच्या वातावरणात पार पडले. एकूण१०१७ मतदानापैकी ८७१ मतदान झाले यामध्ये वार्ड क्रमांक एक मध्ये २१०पैकी १८०, वार्ड क्रमांक दोन ५३२ पैकी ४६१, वार्ड क्रमांक तीन २७५पैकी २३०, असे एकूण १०१८ पैकी ८७१प्रत्यक्ष मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावत वंजारवाडी ग्रामपंचायतीसाठी ८५.६४ % झाले आसुन एकुण 15 उमेदवारांचे भवितव्य मत पेटीत बंद झाले आहे. यावेळी मतदान केंद्राला, स्थानिक गुन्हे शाखा बीडचे सपोनी ज्ञानेश्वर कुकलारे साहेब, क्षेत्रीय अधिकारी गुंड साहेब, आंबोरा पोलीस स्टेशनचे सपोनी रोहित बेंबरे साहेब, मंडळ अधिकारी माढेकर साहेब, तलाठी बी.एस. कवळे साहेब, निवडणूक विभागाचे अधिकारी, खेडकर साहेब. होळकर मॅडम.मनीषा झांजे मॅडम केंद्राध्यक्ष भोंडवे सर. पोलीस अधिकारी सानप साहेब व ग्रामस्थानी.निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य केले.
stay connected