स्वरुपकुमार, भारती गोसावी, डाॅ.घाणेकर , इंदापूरकर आदिंनानाट्यशारदा गौरव पुरस्कार प्रदान
आम्रपाली धेंडे
पुणे :3 डिसेंबर 2022 ; रंगकर्मी स्व.प्रमोद दामले यांच्या स्मृतिदिनानिमित्त तितिक्षा इंटरनॅशनल
संस्थेतर्फे नुकतेच नाट्यशारदा गौरव पुरस्कार वितरण, शब्दगौरव पुरस्कार
वितरण आणि निमंत्रितांचे काल्यसंमेलन आयोजित करण्यात आले होते. नटश्रेष्ठ स्वरुपकुमार, अभिनेत्री भारती गोसावी, विश्व विक्रमवीर एकपात्री.कलाकार डाॅ.मधुसूदन घाणेकर, दिग्दर्शक सतीश इंदापूरकर,यांना
संस्थापक अध्यक्ष प्रिया प्रमोद दामले यांच्या शुभहस्ते नाट्यशारदा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
ज्येष्ठ कवी वि.ग.सातपुते , गीतकार
अमिताभ आर्य, सामाजिक कार्यकर्ते
शैलेश बडदे, सुनील नवले, सारिका
सासवडे आदि मान्यवरांनीही सन्मानित करण्यात आले.
प्रिया दामले यांनी प्रास्ताविक आणि
आभार प्रदर्शन केले. पुरस्कार वितरण
सोहळ्याचे सूत्रसंचालन ज्येष्ठ कवयित्री सुरेखा जाधव यांनी केले.
सचिव अजिता मुळीक आणि सहनिमंत्रक आम्रपाली धेंडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.डाॅ.मधुसूदन घाणेकर संपादित
डहाळी विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले. निमंत्रितांच्या विशेष काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन सहनिमंत्रक सारिका सासवडे यांनी
केले. कृष्णकांत चेके, प्रतिमा काळे,
योगिता कोठेकर, लक्ष्मी रेड्डी, गीताश्री
नाईक, विजय जाधव, मधुकर गायकवाड आदिंनी काव्यसंमेलन
गाजवले.
प्रारंभी डाॅ.घाणेकर यांच्या शुभहस्ते
स्वरुपकुमार यांचा जाहिर सत्कार करण्यात आला.स्वरुपकुमार यांच्या शुभहस्ते निमंत्रित कवी कवयित्रींना
शब्दगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.डाॅ.घाणेकर संपादित
डहाळी विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभहस्ते करण्यात आले.
स्वरुपकुमार आणि भारती गोसावी
यांनी स्व.प्रमोद दामले यांच्या जुन्या
आठवणींना उजाळा दिला.आयुष्यभर
कलेसाठी समर्पित भावनेतून योगदान
दिले तरच कलावंतांकडून दैदीप्यमान
कामगिरी घडू शकते, असे डाॅ.घाणेकर यांनी आपल्या भाषणात सांगितले. याप्रसंगी वि.ग.सातपुते यांचेही भाषण झाले.
चि. अजेया मुळीक आणि चि.गायत्री
धेंडे या हस-या बालिकांना डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते
हास्यविद्या वाचस्पती पुरस्काराने
गौरवण्यात आले.
stay connected