3 डिसेंबर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन "चैतन्य दिन".... शिरीष थोरवे.

 3 डिसेंबर आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन "चैतन्य दिन".... शिरीष थोरवे.



जागतिक पातळीवर संयुक्त राष्ट्र महासभा द्वारे 1992 मध्ये प्रतिवर्षी तीन डिसेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन म्हणून साजरा करावा असा जगातील सर्व देशांना आदेश पारित केला तेव्हापासून 3 डिसेंबर हा दिवस "आंतरराष्ट्रीय दिव्यांग दिन" म्हणून जगभर सर्व दिव्यांग व दिव्यांग प्रेमी सामाजिक संस्था शासकीय कार्यालयात साजरा केला जातो. सर्वसाधारणपणे समाजाच्या लोकसंख्येच्या दहा टक्के लोक कोणत्या ना कोणत्या कारणाने दिव्यांग आहेत. दिव्यांग दिन साजरा करण्याचा उद्देश दिव्यांगांना समाजाच्या सर्व क्षेत्रात समान अधिकार तसेच राजनीतिक सामाजिक आर्थिक सांस्कृतिक जीवनामध्ये जागृती निर्माण व्हावी हा प्रमुख उद्देश आहे. दिव्यांगाचा आत्मसन्मान त्याचे आदर्श जीवन तो सक्षम व्हावा त्याची गुणवत्ता वाढावी यासाठी विविध उपक्रम व प्रचार मोहिमा शासनातर्फे राबवल्या जात असतात. दिव्यांगांना सहानुभूती नको तर त्यांना त्यांचा हक्क समान संधी सक्षमीकरण तसेच गरजू दिव्यांग विद्यार्थ्यांना शिक्षणाची व तत्सम सोयी सवलतीची व्यवस्था व्हावी तसेच सर्वांप्रती आपुलकीची गरज आहे.

1880 साली जन्मलेल्या अमेरिकेतील सुप्रसिद्ध लेखिका सामाजिक कार्यकर्त्या सक्षम राजकारणी डॉक्टर हेडन केलर या स्वतः दिव्यांग असूनही त्या पहिल्या अंदकला पदवीधर होत्या त्यांनी अंधांसाठीची ब्रेल लिपी सर्व गरजू दिव्यांगासाठी जगभर अनिवार्य करण्यासाठी विशेष प्रयत्न केले त्यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य दिव्यांग कल्याण साठी वेचले त्यामुळे या दिवशी आपण सर्व त्यांचे स्मृतीस उजाळा देत असतो.

दिव्यांग बांधवांच्या न्याय हक्कासाठी देशातील पहिले दिव्यांग मंत्रालय महाराष्ट्रात येत्या 3 डिसेंबर पासून होत असून गेल्या पंचवीस तीस वर्षापासून ची मागणी पूर्ण होत आहे. दिव्यांगाचे कैवारी आमदार बच्चुभाऊ कडू यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले दिव्यांगांना त्यांचा न्याय मिळावा शासनाच्या सर्व सुविधा योजना पासून कोणीही दुर्लक्षित राहू नये, त्यांच्या समस्या एका छत्राखाली मार्गी लागाव्यात यासाठी या स्वतंत्र दिव्यांग निर्माण होत आहे. या दिव्यांग कल्याण विभागाचा निश्चित दिव्यांगांना फायदाच होईल असा विश्वास आहे. या अगोदर कार्यरत असलेल्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य या विभागातून सदर दिव्यांग विभाग स्वतंत्र होत आहे यासाठी सर्व दिव्यांगांना आनंद व अपेक्षा निर्माण होत आहेत. याकरिता या विभागासाठी स्वतंत्र सचिव,अधिकारी व कर्मचारी मिळून 2063 नवीन पदांची निर्मिती होत आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी यासाठी वेगळे कार्यालय व त्यासाठी नवीन इमारत होत असून या व इतर बाबींसाठी शासनाने सुमारे 118 कोटी रु.ची तरतूद केली आहे.

त्यामुळे यंदाचा 3 डिसें. 2022 हा जागतिक दिव्यांग दिन आपण सर्व दिव्यांग विशेष उत्साहात आनंदात एक "चैतन्य दिन" म्हणून साजरा करूयात. नवीन दीव्यांग मंत्रालय घोषणेसाठी महाराष्ट्र शासनाचे हार्दिक अभिनंदन व आभार ... मी शिरीष भाऊ थोरवे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दिव्यांग सेल तर्फे  सर्व दिव्यांग बंधू भगिनींना दिव्यांग दिनानिमित्त लक्ष लक्ष शुभेच्छा देत आहे....







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.