यश मिळवण्यासाठी समर्पित भावना हवीच - डाॅ.मधुसूदन घाणेकर
आम्रपाली धेंडे
पुणे: " कुठल्याही क्षेत्रात यश संपादन करण्यासाठी समर्पित भावना असावी
लागते.सातत्य आणि प्रतिकुलतेवर मात करण्याची क्षमता, प्रबुद्ध इच्छाशक्ती ही असावीच लागते. "
असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय विचारवंत ,
आणि समर्पण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विश्वमहात्मा डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी केले.
समर्पण संस्थेतर्फे ज्येष्ठ साहित्यिक
भगवान धेंडे यांना 2022 चा राष्ट्रीय
समर्पण सेवा पुरस्कार डाॅ.मधुसूदन घाणेकर यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला, याप्रसंगी डाॅ.घाणेकर
बोलत होते. या कार्यक्रमास समर्पण संस्थेचे उपाध्यक्ष जयंत हिरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सागर धेंडे, चेतन धेंडे तसेच ज्येष्ठ कार्यकर्त्या जयश्री शिंदे, कामगार नेते राजेंद्र खराडे आणि धेंडे कुटुंबीय उपस्थित होते.
" भगवान धेंडे हे दृष्टीहिन आहेत परंतु
त्यांनी या शारिरीक प्रतिकुलतेवर
अंतर्मनाच्या दिव्यचक्षुंनी मात करुन
साहित्य क्षेत्रात दैदीप्यमान यश संपादन केले." या शब्दात डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी भगवान धेंडे यांचा गौरव केला. " मी उत्स्फूर्तपणे लिहित गेलो आणि साहित्यप्रेमी मला दाद देत गेले " असे
भगवान धेंडे यांनी आपल्या कृतज्ञतापूर्वक मनोगतात सांगितले.
जयंत हिरे यांनी आभार मानले.
कार्याध्यक्ष प्रविण शेटे, उपाध्यक्ष डाॅ.योगेश जोशी, सचिव प्रतिमा काळे
यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.
आपले कुणा म्हणावे
हा प्रश्नच पडे मनाला
माझी व्यथा मनाची
सांगु तरी कुणाला
ही गझलही भगवान धेंडे यांनी सादर.केली.
stay connected