गोधनी येथे मृदगंध साहित्य चळवळीतर्फे सत्कार व कवीसंमेलन

 गोधनी येथे मृदगंध साहित्य चळवळीतर्फे सत्कार व कवीसंमेलन

---------------------------------------------






गोधनी: साहित्याचे संगोपन हे मौखीक व लिखीत स्वरूपात होण्याच्या अनुषंगाने गोधनी येथील मृदगंध साहित्य चळवळीतर्फे काव्यकलश या शीर्षकाखाली कवीसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.  याप्रसंगी प्रथम उद्‌घाटकीय सत्रात सौ. रुपालीताई राहूल मनोहर, यांची नागपूर पंचायत समीतीच्या सभापतीपदी निवड झाल्याबद्दल  सत्कार करण्यात आला. सोबतच गोधणीचे सरपंच श्री. दीपक राऊत यांचाही सत्कार करण्यात आला. पुन्हा गोधनीतील प्रबोधन वाचनालय कडूनही मनोहर ताईचा सत्कार करण्यात आला. सोबतच उपस्थीत साहित्यीक श्री. अंकुश शिंगाडे यांचाही सत्कार करण्यात आला. मंचावर मृदगंध साहित्य चळवळीचे प्रवर्तक व संयोजक श्री राजेश वैरागडे,  श्री शंकर घोरसे, माजी पंचायत समिती सदस्य श्री. रामदासजी राऊत, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक श्री. वीरेंद्र गोतमारे उपस्थीत होते. या सत्राचे प्रास्तावीक श्री. राजेश वैरागडे यांनी केले. तसेच  सूत्रसंचालन प्रा. डॉ. प्रशांत राऊत यांनी केले. 

           दुसऱ्या सत्रात कवीसंमेलनाच्या संत्राचे अध्यक्ष गझलकार व कवी श्री. प्रकाश कांबळे असून या सत्रात  विविध भागातून आलेल्या ४० कविंनी विवीध आशयाच्या कविता सादर केल्या. गोधणी ग्रामातील स्थानिकांनीही त्यांच्या रचना सादर केल्या आणि मराठीला अधीक समृद्ध केले.

कविसंमेलनाचे सुत्रसंचालन श्री. नरेंद्र माहूरतळे यांनी केले. तसेच संपुर्ण कार्यक्रमातील पाहुण्यांचे आभार प्रा. संजय तिजारे यानी मानले. शेवट श्री. कमलेश मनोहर यांच्या पसायदान गायनाने झाला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. सुनिल वाडे,

अनील डिकोंडवार, श्री. अनील बन्सोड, विजय कृष्णा, श्री. विजय वावगे यांनी परिश्रम घेतले.

---------------------------------------------






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.